आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराट्विटरचे नवीन मालक एलन मस्क यांनी गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दिवाळखोर होण्याची शक्यता व्यक्त केली. रिपोर्टनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विटर कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, कंपनी दिवाळखोरीची शक्यता नाकारता येत नाही.
मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर दोन आठवड्यांपूर्वी 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतला. या डीलनंतर क्रेडिट तज्ज्ञांनी सांगितले होते की, या महागड्या डीलचा थेट परिणाम ट्विटरच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे.
ट्विटरच्या 2 प्रमुख अधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने रॉयटर्सला सांगितले की, ट्विटरचे दोन उच्च अधिकारी, जोएल रॉथ आणि रॉबिन व्हीलर यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी बुधवारी मस्कसोबत ट्विटर स्पेस चॅट नियंत्रित केले आणि जाहिरातदारांनी पाठ फिरवल्याबद्दलच्या चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला. रॉथ आणि व्हीलर यांनी आतापर्यंत याविषयी विचारलेल्या प्रश्नांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
चीफ सिक्युरिटी ऑफिसरसह 3 अधिकाऱ्यांचा राजीनामा
तत्पूर्वी, गुरुवारी ट्विटरचे मुख्य सुरक्षा अधिकारी ली किसनर यांनी ट्विट केले की, त्या आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. एवढेच नाही, तर चीफ प्रायव्हसी ऑफिसर डॅमिन किराण आणि चीफ कम्प्लायन्स ऑफिसर मॅरिएन फोगार्टी यांनीही राजीनामा दिला आहे. या सर्व राजीनाम्यांनी ट्विटरच्या बिकट आर्थिक स्थितीकडेही लक्ष वेधले आहे.
पुढील वर्षी कंपनीचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते: मस्क
यूएस फेडरल ट्रेड कमिशनने म्हटले आहे की, प्रायव्हसी आणि कम्प्लायन्स अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर ते ट्विटरवर देखरेख करत आहे. या राजीनाम्यांमुळे ट्विटरला नियामक आदेशांचे उल्लंघन होण्याचा धोका आहे. गुरुवारी मस्क यांची ट्विटर कर्मचाऱ्यांसोबत पहिली भेट झाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी स्वतः या बैठकीत सांगितले की, कंपनीला पुढील वर्षी अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. तथापि, संभाव्य दिवाळखोरी, FTC वॉर्निंग किंवा राजीनामे याबद्दलच्या प्रश्नांवर ट्विटरकडून कोणतेही उत्तर आले नाही.
ट्विटरला दररोज 4 मिलियन डॉलर्सचे नुकसान
27 ऑक्टोबर रोजी ट्विटर विकत घेतल्यानंतर एलन मस्क यांनी एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेतले आहेत. वरच्या अधिकार्यांपासून ते कंपनीत काम करणार्या अनेक कर्मचार्यांना कंपनीतून हाकलून दिले. आता एलन मस्क म्हणतात की, मी कंपनीची सूत्रे हाती घेताच जाहिरातदारांनी आम्हाला पाठिंबा देण्याऐवजी आम्हाला सोडणे योग्य मानले. त्यामुळे ट्विटरला दररोज 4 मिलियन डॉलरचे नुकसान होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.