आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • EMI Loan Moratorium News; Supreme Court Loan Moratorium Verdict Today Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुप्रीम कोर्टाचा निकाल:माेरेटाेरियम मुदतीतील कर्जावरचक्रवाढ व्याज लागणार नाही, ग्राहकांसोबत बँकांनाही दिलासा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरबीआयने 1 मार्च ते 31 मे पर्यंत कर्ज वाटप करणाऱ्या कंपन्यांना कर्ज स्थगिती देण्याचे सांगितले होते

सुप्रीम कोर्टाने माेरेटाेरियम (काही अवधीसाठी कर्जाचे हप्ते भरण्यावर दिलासा) प्रकरणात कर्जधारकांना दिलासा दिला आहे. आपल्या निकालात मंगळवारी कोर्ट म्हणाले, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माेरेटाेरियमच्या ६ महिन्यांच्या मुदतीदरम्यान चक्रवाढ वा दंडात्मक व्याज घेण्याचे काहीही अाैचित्य नाही. हा दंड जाणूनबुजून कर्ज न फेडणाऱ्यांवर लावला जातो. यामुळे तो बँकांद्वारे वसूल केला असेल तर त्याला कर्जदाराच्या खात्यात परत देणे, क्रेडिट वा अॅडजस्ट करावे लागेल.

तथापि, सुप्रीम कोर्टाने बँकांनाही काही दिलासा दिला आहे. कोर्ट म्हणाले, व्याजात पूर्णपणे सूट शक्य नाही. कारण त्याचा थेट परिणाम खातेधारकांवर पडेल. यासोबतच कोर्टाने लोन मोरेटोरियमची मुदत वाढवण्यासही नकार दिला. गतवर्षी काेराेना महामारीमुळे संपूर्ण देशभरात लाॅकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प होते. मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. यामुळे रिझर्व्ह बँकेने कर्जाचे हप्ते फेडण्यावर ६ महिन्यांचे माेरेटाेरियम दिले होते. आधी १ मार्च ते ३१ मे आणि नंतर ते वाढवून ३१ ऑगस्टपर्यंत सवलत देण्यात आली होती.

न्या. अशाेक भूषण यांच्या पीठाने माेरेटाेरियमची मुदत ३१ ऑगस्टनंतर वाढवण्यास नकार देत हा धोरणात्मक निर्णय असल्याचे म्हटले होते. जोवर त्यात दुर्भावना वा मनमानीपणा नसेल तोवर आम्ही त्याचा न्यायालयीन आढावा घेऊ शकत नाही.
अनेक संघटनांकडून याचिका : माेरेटाेरियम वाढवणे आणि इतर उपायांची मागणी करत सुप्रीम कोर्टात अनेक व्यापारी संघटनांनी याचिका दाखल केल्या होत्या. सरकारने दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेणाऱ्यांना मोरेटोरियम दरम्यान व्याजावरील व्याजात माफी देण्याची घोषणा केली होती. ६ महिन्यांच्या लोन मोरेटोरियम अवधीत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजावर व्याज माफ करण्यात आले होते.

जाणून घ्या निकालाचा अर्थ
व्याजावर व्याज भरावे लागेल काय?

चक्रवाढ व्याज घेतले जाणार नाही. व्याजावर व्याज भरावे लागणार नाही.
व्याजावर काही सवलत आहे का?
नाही. सुप्रीम कोर्टाने पूर्ण व्याजावर सूट देण्यास नकार दिला आहे. कारण त्यामुळे खातेधारकांचे नुकसान होईल.
लोन मोरेटोरियमचा लाभ कधीपर्यंत?
सुप्रीम कोर्टाने लोन मोरेटोरियमची मुदत वाढवण्यास नकार दिला. ही मुदत ३१ ऑगस्ट २०२० पर्यंतच होती.

बातम्या आणखी आहेत...