आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात नोकरदार वर्गाचा मोठा भाग हा मालकाच्या गट आरोग्य विम्यावर अवलंबून आहे. चांगली गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या लोकांकडे थोडाफार हेल्थ इंशुरन्स कव्हर असतो, पण अनेकदा तो अपुरा ठरतो. कॉर्पोरेट आरोग्य विमा सर्व प्रकारची वैद्यकिय आणीबाणी कव्हर करत असेल.
अशा वेळी तुम्ही टॉप-अप किंवा सुपर टॉप-अप प्लॅन घेऊ शकता. तो कमी प्रीमियमवर सध्याच्या विम्याच्या अतिरिक्त कव्हरेज ऑफर करतो.
1 टॉप-अप : याअंतर्गत बेसिक पॉलिसीशिवाय एका मर्यादेपर्यंत अॅड-ऑन कव्हरेज मिळतो. बेसिक कव्हरेज वापरल्यानंतर तो अॅक्टिव्हेट होतो. तथापि, हा विमा कालावधीदरम्यान एका क्लेमसाठीच फायद्याचा आहे.
2 सुपर टॉप-अप : हे बेसिक पॉलिसी कालावधीत निश्चित रकमेपर्यंत अनेक क्लेम घेण्याची परवानगी देतात. प्रीमियम टॉप-अप प्लॅनपेक्षा जास्त.
टॉप-अप घेताना हे लक्षात ठेवा :
टॉप-अपचे सम डिडक्टिबल मूळ प्लॅनच्या सम-इंश्योर्ड समान असावे.
टॉप अप प्लॅनमध्ये जी तुम्हाला हवी ती सर्व कव्हरेज आहे, हे पाहा.
बेसिक प्लॅन ज्या कंपनीचा आहे तिचाच टॉप-अप वा सुपर टॉप-अप घेणे चांगले, पण हे गरजेचे नाही.
टॉप-अप, सुपर टॉप-अप प्लॅनच्या नेटवर्कमध्ये जवळचे रुग्णालय असावे.
- अमित जैन, अध्यक्ष लिबर्टी जनरल इंशुरन्स
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.