आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • EPF ; PF ; Retirement Fund : Corona ; Do Not Hurry To Withdraw Money From PF Account, Retirement Fund Will Lose More Than 11 Lakhs After Withdrawing Rs 1 Lakh; News And Live Udpates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावधान:पीएफ खात्यातून पैसे काढण्याची घाई करु नका? 1 लाख रुपये काढल्यावर रिटायरमेंट फंडला होणार 11 लाखांचे नुकसान

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुम्ही जेवढे जास्त पैसे काढाल तेवढे जास्त नुकसान रिटायरमेंट फंडला होणार आहे

सरकारने एम्लॉई प्रोव्हिडेंट फंड किंवा प्रोव्हिडेंट फंडच्या (EPF किंवा PF) खात्यातून पैसे काढण्यासाठी ऑनलाईन सुविधा तयार केली आहे. यामुळे कर्मच्याऱ्यांना आपले पैसे पीएफ खात्यातून काढणे सोपे जाणार आहे. परंतु, तुम्हाला जर पैशाची गरज असेल किंवा तुम्ही जर अडचणीत असाल तर पीएफ खात्यातून पैसे काढण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या. जर तुम्ही आता याकडे दुर्लक्ष केले तर याचे परिणाम तुम्हाला समोर जाणवतील. चला तर जाणून घेऊया पीएफमधून पैसे काढले तर आपल्या रिटायरमेंट फंडला किती रुपयांचे नुकसान होईल.

आपल्या रिटायरमेंट फंडला किती परिणाम होईल
अंदाजे कॅलकुलेशननुसार, जर तुमच्या रिटायरमेंटचे 30 वर्ष बाकी असेल आणि तुम्ही जर तुमच्या पीएफ खात्यातून 50 लाख रुपये काढत असाल तर तुमच्या रिटायरमेंट फंडला 5 लाख 27 हजार रुपयांचे नुकसार होणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी करताना लक्ष देणे तेवढेच गरजेचे असल्याचे तज्ञांचे मत आहे.

किती पैसे काढल्यावर20 वर्षांनंतर किती कमी पैसे मिळतील30 वर्षांनंतर किती कमी पैसे मिळतील
10 हजार51 हजार1 लाख 16 हजार
20 हजार1 लाख 02 हजार2 लाख 31 हजार
50 हजार2 लाख 55 हजार5 लाख 58 हजार
1 लाख5 लाख 11 हजार11 लाख 55 हजार
2 लाख10 लाख 22 हजार23 लाख 11 हजार
3 लाख15 लाख 33 हजार34 लाख 67 हजार

जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत पैसा काढू नका
काही मनी मॅनेजमेंट एक्सपर्टच्या मते, जोपर्यंत आपल्याला खरोखरच पैशाची गरज भासत नाही तोपर्यंत पीएफ खात्यातून पैसे काढण्यापासून वाचावे. कारण तुम्ही जेवढे जास्त पैसे काढाल तेवढे जास्त नुकसान रिटायरमेंट फंडला होणार आहे. कारण आपल्या पीएफ खात्यातील पैशावर 8.5% दराने व्याज मिळत आहे.

पीएफ किती कटत असतो
नियमांनुसार, लोकांना आपल्या सॅलरी आणि महागाई भत्यातील 12% रक्कम आपल्या पीएफ खात्यात जमा करणे अनिवार्य आहे. यामधील 3.67% पैसे हे एम्लॉई प्रोव्हिडेंट फंडमध्ये जमा होत असतात. बाकी 8.33% रक्कम कर्मचारी पेंशन योजना (EPS) जमा होते.

बातम्या आणखी आहेत...