आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Analysis:इक्विटीत गुंतवणूक 9  महिन्यांच्या उच्चांकावर

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेब्रुवारीमध्ये सेन्सेक्स 1.25% आणि निफ्टी १.७७% खाली होता

शेअर बाजारात घसरणीनंतरही गेल्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात ९ महिन्याची विक्रमी गुुंतवणूक झाली. फेब्रुवारीत इक्विटी फंडात १५,६८५.६ कोटी रुपये आले. जानेवारीच्या तुलनेत सुमारे २५% जास्त आहे. यापूर्वी गेल्या वर्षी मेमध्ये इक्विटी फंडात १८,५२९ कोटी रुपये आले होते. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’च्या मते, फेब्रुवारीत सलग तिसऱ्या महिन्यात इक्विटी फंडात गुंतवणूक वाढली आहे. नाेव्हेंबर २०२२ मध्ये इक्विटी फंडात फक्त २,२५८ कोटी रुपये आले होते. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात सेन्सेक्समध्ये १.२५% आणि निफ्टत १.७७% घसरणीची नोंद झाली. या महिन्यातदेखील बाजारात चढ-उतार वाढला आहे. गेल्या दोन दिवसात सेन्सेक्स १,२१३ अंकांनी घसरले आहे. तरीही २४ महिन्यातून इक्विटी फंडात निव्वळ गुंतवणुकीचा कल दिसून येत आहे.

सलग तिसऱ्या महिन्यात लिक्विड फंडातून पैसे काढले डेट कॅटेगरीत लिक्विड फंडातून सलग तिसऱ्या महिन्यात पैसे काढण्यात आले आहेत. याचा वापर कंपन्या सामान्यपणे छोटा कालावधीची रोकड ठेवण्यासाठी करतता. कारण मार्च आर्थिक वर्षाचा शेवटचा महीना असतो, त्यामुळे जानेवारी-मार्चदरम्यान लिक्विड फंडातून पैसे काढणे सुरू होते.

ईटीएफमध्ये नफावसुली, इंडेक्स फंडात गुंतवणूक वाढली फेबुवारीत एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ईटीएफ)मध्ये फक्त २९ कोटी रुपयाचा निव्वळ गंुतवणूक झाली. दुसरीकडे इंडेक्स फंडात ६,२४४ कोटी रुपये आले. प्रत्यक्षात, ईटीएफमध्ये १४,८०१ कोटी रुपयांसह १४,७७२ कोटी रुपये काढण्यात आले. दुसरीकडे, इंडेक्स फंडामध्ये ९,४७६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याऐवजी केवळ ३,२३२ कोटी रुपये काढण्यात आले.

एसआयपी अकाउंट वाढले, गुंतवणुकीत किंचित घट फेब्रुवारीत सिस्टिमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) अकाउंट वाढून ६.२८ कोटी झाले. जानेवारीत हा आकडा ६.२१ कोटी होते. या दरम्यान म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने एसआयपीच्या माध्यमातून १३,६८६.२३ कोटी गोळा केले. जानेवारीच्या तुलनेत हे १६९.९० कोटी कमी आले. एएमएफआयचे सीईओ एनएस व्यंकटेश म्हणाले, “हे घडले कारण फेब्रुवारीमध्ये फक्त २८ दिवस होते. साधारणपणे एसआयपीमध्ये महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसात गुंतवणूक केली जाते.

बातम्या आणखी आहेत...