आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथेनॉल मिश्रित पेट्रोल:इथेनॉल मिश्रणामुळे 41,000 कोटींची बचत

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरामुळे देशाची ४१,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलनाची बचत झाली आहे, असे पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले.

सस्टेनेबल मोबिलिटी या विषयावर सियाम या औद्योगिक संस्थेने आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात बोलताना मंत्री म्हणाले की सस्टेनेबल मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध मार्गांनी काम करत आहे.भारताने अलीकडेच १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य ५ महिने अगोदर गाठले, ज्यामुळे देशासाठी ४१,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इंधन आयातीची बचत झाली, असे चौबे यांनी नमूद केले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे, ते पुढे म्हणाले, आमचे पुढील लक्ष्य २० टक्के इथेनॉल मिश्रण साध्य करण्याचे आहे आणि ते २०२५-२६ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.,असेही ते म्हणाले. पूर्वी इंधन-दर्जाचे इथेनॉल केवळ उसापासून तयार केले जात असताना, २०१८ पासून उसाचा रस, साखर आणि साखरेचा पाक, जड मळी, मानवी वापरासाठी अयोग्य खराब झालेले अन्नधान्य, अतिरिक्त तांदूळ आणि मका यासारखे पर्यायी मार्ग खुले करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...