आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाची घसरण:युरो दोन दशकांच्या नीचांकी पातळीवर, रुपयाची स्थिती चांगली

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत युरोची किंमत सोमवारी दोन दशकांत पहिल्यांदाच ०.७% कोसळून ९८.८० अमेरिकी सेंटच्या बरोबर झाली होती. २००२ नंतर युरोझोन देशांच्या सामान्य चलनाची खालची पातळी आहे. मात्र डॉलरसह इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण कमी झाली.

२०२२ मध्ये आतापर्यंत रुपया यूएस डॉलरच्या तुलनेत फक्त ७.३५% कमकुवत झाला. दुसरीकडे युरो, ब्रिटिश पाैंड, जपानी येनसारख्या इतर प्रमुख चलनांत अडीचपटापर्यंत घसरण झाली. रशियाची ऊर्जा कंपनी गॅजप्रोमने गॅसच्या पुरवठ्यात कपात करण्याच्या घोषणेमुळे युरोमध्ये नुकतीच घसरण आली. गॅजप्रोमने सांगितले, नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनमधून युरोपाचा गॅस पुरवठा अनिश्चित काळासाठी थांबवेल.

म्हणून रुपयाची कामगिरी चांगली यूएस उच्च चलनवाढ आणि मंदीच्या जोखमीशी झुंजत असताना, युरोप आणि यूकेमधील आर्थिक परिस्थिती तणावपूर्ण आहे. पण या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताला कमी धोका आहे.

बातम्या आणखी आहेत...