आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) विक्री २०२७ पर्यंत ९० लाखांचा आकडा पार करण्याची अपेक्षा आहे. इंडियन प्रायव्हेट इक्विटी आणि व्हेंचर कॅपिटल असोसिएशन (आयव्हीसीए) द्वारे ईव्हाय आणि इंडस लॉच्या सहकार्याने प्रकाशित इलेक्ट्रिफाइंग इंडियन मोबिलिटी नावाच्या अहवालात म्हटले की, भारताची इलेक्ट्रिक इकोसिस्टिम सलग विकास करत आहे. २०२१मध्ये १६८% वाढीसह ३.३ लाख ईव्ही रजिस्टर्ड झाली होती. तर या वर्षी पहिल्या तिमाहीत देशात १ कोटी १० लाख ईव्ही रजिस्टर झाली आहेत. २०१७पर्यंत हा आकडा अनेक पट वाढेल. याच्या मागे पर्सनल मोबिलिटीची मागणी, पर्यावरणाविषयी जागरूकता आणि पेट्रोलच्या किमतीत वाढ होणे मुख्य कारण आहे. आयव्हीसीएचे अध्यक्ष रजत टंडन म्हणाले, ईव्ही उद्योगाला २०२१ या वर्षात १३,५८२ कोटी रुपयांची खासगी इक्विटी/व्हेंचर कॅपिटल गुंतवणूक मिळाली. या वर्षी आतापर्यंत ५३२१ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. अहवालात ईव्ही इंडस्ट्रीमध्ये २०३० पर्यंत १ कोटी प्रत्यक्ष आणि ५ कोटी अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.