आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफबीट ऑप्शन:सर्जनशील विचारांचे आयआयटी, आयआयएम पदवीधरही आता कथालेखनाकडे वळत आहेत

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसबीआय रिसर्च रिपोर्टनुसार, २०२३ पर्यंत ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी मार्केट ११,९४४ कोटी रुपयांचे होईल. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, व्हूट, जी 5 आणि डिज्नी+हॉटस्टारसारख्या ओटीटी प्लॅटफाॅर्म्सवर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, मात्र कथा लेखनाने तरुणांचे लक्ष या क्षेत्राकडे आकर्षित केले आहे. पाताल लोकचे कथा लेखक सुदीप शर्मा आयआयएम पदवीधर आहेत. त्यांनी कॉर्पोरेट जॉब सोडून या क्षेत्रात प्रवेश केला आहे. असूर : वेल्कम टू युवर डार्क साइड वेबसीरिजचे लेखक गौरव शुक्ला फिजियोथेरेपी पदवीधर आहेत. कोटा फॅक्टरीचे लेखक हिमांशू चौहान आयआयटीतून (बॉम्बे) शिकलेले आहेत. यामुळे लेखनाला पूर्णवेळ करिअर म्हणून स्वीकारण्याबाबतची मिथके गळून पडली आहेत. आता सर्व प्रतिष्ठित संस्थांचे पदवीधर तरुण या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहू लागले आहेत. मात्र येथे यशस्वी होण्यासाठी आता पदवीसह पूर्ण तयारी करावी लागणार आहे.

नवा विचार करत असाल तर... लेखनाशी संबंधित अभ्यासक्रमासाठी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेची निवड करू शकता. एफटीआयआयच्या स्क्रीन रायटिंग अभ्यासक्रमात केवळ लेखनच नव्हे तर त्याच्याशी संबंधित थिअरिजही शिकवल्या जातात. याशिवाय व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल, अन्नपूर्णा कॉलेज ऑफ फिल्म अँड मीडियासह अशा अनेक संस्था आहेत, जेथे तुम्ही या क्षेत्रातील बारकावे शिकू शकता. पदवीसोबत काही आवश्यक कौशल्यांचीही गरज असते. उदा. कथा लेखनापूर्वी संशोधन, भाषेवर प्रभुत्व, पात्र उभे करण्याची क्षमता, नवीन, रचनात्मक विचार आणि तार्किक क्षमताही गरजेची असते.

बातम्या आणखी आहेत...