आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Excitement Over US Interest Rate Hikes; Sensex Close To 60 Thousand; News And Live Updates

बाजाराला पंख फुटले:अमेरिकेत व्याजदरात वाढ न झाल्याने उत्साह; सेन्सेक्स 60 हजारांजवळ; रिअॅल्टीच्या नेतृत्वात सेन्सेक्समध्ये 958 अंकांची उसळी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निफ्टी सुमारे 276 अंक उसळून 17,800 पार बंद झाला ​​​​​​​

देशाच्या शेअर बाजारांत गुरुवारी मोठ्या तेजीचे वातावरण दिसले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९५८.०३ अंकांची(१.६३%) उसळी घेत ५९,८८५.३६ च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. एनएसईच्या निफ्टीत २७६.३० अंकांची(१.५७%) तेजी राहिली. हा १७,८२२.९५ च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. विश्लेषकांनुसार, अमेरिकी केंद्रीय बँकेने शक्यता नाकारत व्याजदरांत तत्काळ वाढ केली नाही. यामुळे जगाच्या शेअर बाजारांत धारणा बळकट झाली. भारतीय बाजारही यापासून लांब राहिले नाहीत. रिअॅल्टी आणि बँक, फायनान्शियल शेअर्सच्या नेतृत्वाखालील खरेदीच्या जोरावर बीएसईच्या १९ पैकी १८ क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले.

२२ टक्के वधारला बीएसई रिअॅल्टी इंडेक्स
गेल्या तीन दिवसांत रिअल इस्टेट शेअर्समधील तेजीमुळे बीएसईचा रिअॅल्टी इंडेक्स ७०८.०२ अंक(२१.९३%) वधारला आहे. २० सप्टेंबरला ३,२२८.०९ च्या पातळीवर होता. गुरुवारी ३,९३६.११ वर बंद झाला. नाइट फ्रँक इंडियाचे ईडी(कॅपिटल मार्केट्स) शरद अग्रवाल यांच्यानुसार, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा भारतीय रिअल इस्टेट बाजारात विश्वास वाढला आहे. सरकारचे अनुकूल धोरण, १८ महिन्यांच्या प्रलंबित मागण्या, आकर्षक किमती आणि कर्जाचे दर सर्वात कमी झाल्याने रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षक दिसत आहे.

प्रत्येक वाढीत हळूहळू नफावसुली केली पाहिजे
लहान गुंतवणूकदारांनी बाजारात नोंदणाऱ्या प्रत्येक वाढीसोबत हळूहळू नफा वसूल केला पाहिजे. चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पोर्टफोलिओ संतुलित केला पाहिजे. गुंतवणुकीच्या हिशेबाने आयटी, फार्मा, एफएमसीजी, केमिकलसारख्यी क्षेत्रे सुरक्षित संबोधली जातात. -विनोद नायर, हेड ऑफ रिसर्च, जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेस

बाजारात तेजीची प्रमुख कारणे

  • अमेरिकी केंद्रीय बँकने व्याजदर वाढवले नाहीत.
  • फेड प्रमुख म्हणाले, एव्हरग्रँड संकट चीनपुरते मर्यादित राहील.
  • बाजारातील नकारात्मक कल सुधारला आहे.
  • चीनमध्ये कंपन्यांवर नवीन निर्बंधांमुळे विदेशी गुंतवणूकदार भारताकडे वळत आहेत.
बातम्या आणखी आहेत...