आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • China Laber Cost Benifite | Exports Of Decorative Items To US Rise, India Among Top 5 Suppliers

चीनच्या वाढत्या लेबर खर्चामुळे फायदा:अमेरिकेत सजावटीच्या वस्तूंची निर्यात वाढली, भारत टॉप-5 पुरवठादारांमध्ये

नई दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यात अमेरिकेत सजावटीच्या वस्तूंची निर्यात वार्षिक आधारावर सुमारे तीनपट वाढून १६० कोटी रुपये झाली आहे. याबरोबरच भारताने याबाबतीत फिलिपाइन्सला मागे टाकत अमेरिकेच्या टॉप ५ पुरवठादारांमध्ये जागा बनवली आहे. चीनमध्ये कोविड निर्बंध धोरणांमुळे लॉकडाऊन आणि वाढलेल्या लेबर खर्चामुळे भारतात फायदा झाला. अ

लीकडच्या वर्षांत, भारताकडून अमेरिकेत ख्रिसमस सजावट आणि टी-शर्टची निर्यात वाढली. सरकारी आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये भारतातील ख्रिसमस सजावट निर्यात ५४% आणि हस्तकला निर्यात ३२% वाढली. निर्यातदारांच्या मते, कमी कामगार खर्चाच्या रूपात भारताला लोकसंख्येच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असल्याचा फायदा मिळत आहे. सणासुदीच्या मागणीत वाढ झाल्याचा फायदा लहान उत्पादकांना होत आहे. एशियन हँडिक्राफ्टचे उद्योजक अमित मल्होत्रा सांगतात, सजावटीच्या वस्तू वॉल्ट डिस्ने, हॅरॉड ऑफ लंडन, टार्गेट कॉर्प आणि डिलार्ड इंकसारख्या कंपन्यांना निर्यात केल्या जातात. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या ऑर्डरमध्ये सुमारे २०% वाढ झाली.

भारताकडे शिफ्ट होताहेत चीनला मिळणाऱ्या आयात ऑर्डर

अमित यांच्या मते, अमेरिकेला नाताळासाठी चीन सजावटीच्या वस्तू निर्यात करत होते. चीनची यात मोठी भागीदारी होती. मात्र या वर्षी चीनच्या बऱ्यच ऑर्डर भारताकडे शिफ्ट होत आहेत. युराेप आणि अमेरिकेचे अनेक नवे खरेदीदार भारताला ऑर्डर करत आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार २०२३ पर्यंत भारतामध्ये जगातील सर्वात मोठी कामगार शक्ती असेल. भारत जागतिक अर्थव्यवस्थेत वार्षिक ५०० अब्ज डॉलर (३९.८९ लाख कोटी) पेक्षा जास्त योगदान देऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...