आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:मे महिन्यात देशातील निर्यात 1 5.46 टक्क्यांनी वाढून 37.3 अब्ज डॉलरवर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि रसायने यांसारख्या क्षेत्रांच्या चांगल्या कामगिरीमुळे मे महिन्यात भारताच्या व्यापारी मालाची निर्यात १५.४६ टक्क्यांनी वाढून ३७.२९ अब्ज डॉॅलर झाली आहे. या काळात व्यापार तूट २३.३३ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढल्याचे वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.

मे २०२१ मध्ये व्यापार तूट ६.५३ अब्ज डॉलरवर होती. एप्रिल - मे २०२२-२३ मध्ये भारताची व्यापारी निर्यात ७७.०७८ अब्ज डॉलर्स झाली आहे. एप्रिल-मे २०२१-२२ मधील ६३.०५ अब्ज डॉलरच्यातुलनेत त्यात २२.२६ टक्केवाढ झाली आहे,” असे त्यात म्हटले आहे. मे २०२२ मध्ये पेट्रोलियम आणि कच्च्या तेलाची आयात ९१.६ टक्क्यांनी वाढून १८.१४ अब्ज डॉलर झाली आहे. कोळसा, कोक आणि ब्रिकेट्सची आयात मे २०२१ मधील २ अब्ज डॉलरच्या तुलनेत वाढून ती ५.३३ अब्ज डॉलरवर गेली आहे. सोन्याची आयात आढावा महिन्यात वाढून ती मे २०२१ मधील ६७७ दशलक्ष डॉलरच्या तुलनेत ५.८२ अब्ज डॉलरवर गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...