आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:फेसबुक आणि गुगलची कार्यालये जुलैमध्ये उघडणार, कर्मचारी वर्षअखेरपर्यंत करू शकतील वर्क फ्रॉम होम

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • कार्यालयात सुरक्षात्मक उपाय वाढवले जाताहेत, तरीही घरातून कामाला प्राधान्य

कोरोना विषाणू महारोगराईमुळे जगभरातील अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. अनेक बड्या कंपन्यांना आपली कार्यालये बंद करून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉमची सुविधा द्यावी लागली. अमेरिकेतील दिग्गज टेक कंपन्या फेसबुक आणि गुगलनेही महारोगराईच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्यात शिथिलता दिली जात असल्याने कंपन्यांची कार्यालयेही सुरू झाली आहेत. गुगल आणि फेसबुकही जुलैमध्ये कार्यालये उघडत आहे. मात्र, या दोन्ही कंपन्यांनी सांगितले की, त्यांचे जे कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत, त्यांना या वर्षअखेरपर्यंत ही सुविधा मिळेल. गुगलने याआधी सांगितले होते की, त्यांची वर्क फ्रॉम पॉलिसी १ जूनपर्यंत लागू राहील. मात्र, त्यांनी यात आता सात महिने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, फेसबुकने सांगितले की, त्यांचे कार्यालय ६ जुलैपर्यंत सुरू होईल, मात्र कर्मचारी डिसेंबरअखेरपर्यंत वर्क फ्रॉम होम करत राहतील. 

गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी सांगितले की, ज्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची आवश्यकता आहे, ते जुलैपासून येऊ शकतील. कर्मचाऱ्यांचा संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी गुगल जगभरातील कार्यालयांत सुरक्षा मानकांत वाढ करत आहे. बहुतांश कर्मचारी घरातून काम सुरू ठेवू शकतात. ते या वर्षाच्या अखेरीस तसे करू शकतील. फेसबुकच्या प्रवक्त्याने यासंदर्भात सांगितले की, जे कर्मचारी कार्यालयापासून दूर आपले काम सुरू ठेवू शकतात, ते वर्षअखेरपर्यंत वर्क फ्रॉम होम सुविधेचा लाभ उचलू शकतात. पिचई म्हणाले, स्थितीत बदल होत आहे. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य कामावर परतण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात गुंतले आहेत. 

फेसबुकने ७५ हजार रुपयांचा बोनसही दिला होता

महारोगराईत कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देणाऱ्या सुरुवातीच्या कंपन्यांत फेसबुकचा समावेश आहे.फेसबुकने घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरात वर्क स्टेशन तयार करणे आणि मुलांच्या देखभालीसाठी १ हजार डॉलर( ७५ हजार रु.) बोनसही दिला होता. कोरोना महारोगराईमुळे भारतासह अनेक कंपन्या आपल्या वर्क कल्चरवर गांभीर्याने विचार करत आहेत. टीसीए, इन्फोसिसव एचसीएलसारख्या भारतीय कंपन्यांनीही वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत राहू,असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...