आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर पाठोपाठ मेटाने इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही ब्लू टिक सेवा सुरू केली. याच्या मदतीने आता कोणताही इंस्टाग्राम आणि फेसबुक यूजर्स त्याच्या प्रोफाईलवर ब्लू टिक लावू शकतो. यासाठी त्याला काही शुल्क मोजावे लागणार आहे.
वेबवर साइन अप करणार्या यूजर्सला फक्त फेसबुकवर ब्लू टिक्स मिळतील तर मोबाईल अॅप वापरकर्त्यांना फेसबुक आणि Instagram या दोन्हींसाठी ब्लू टिक्स मिळतील. हा निळा टिक एक पडताळणी बॅज आहे. जो सूचित करतो की खाते प्रामाणिक असून सार्वजनिक व्यक्ती, सेलिब्रिटी किंवा ब्रँडशी संबंधित आहे.
मोबाइलवर दरमहा 1,237 रुपये द्यावे लागतील
कंपनीने सध्या ही सेवा अमेरिकेत सुरू केली आहे, लवकरच ही सेवा इतर देशांमध्येही सुरू होणार आहे. वापरकर्त्यांनी वेबवर साइन अप केल्यास या सेवेची किंमत प्रति महिना $11.99 (रु. 989) किंवा त्यांनी मोबाईल अॅपद्वारे साइन अप केल्यास $14.99 प्रति महिना (रु. 1237) आहे.
सबस्क्रिप्शनकडे वळण्याचे 3 प्रमुख कारणे
स्थूल आर्थिक मंदी, स्पर्धा आणि कमी जाहिराती यांमुळे महसुलात घट झाली आहे.
कंपनीचे भांडवल कार्यक्षम बनवण्यासाठी झुकरबर्गला नवीन मॉडेलसह महसूल वाढवायचा आहे.
झुकेरबर्गने मेटाव्हर्ससाठी मोठी गुंतवणूक केली आहे. त्याला त्याची भरपाई करायची आहे.
ट्विटर केली सर्वप्रथम सुरूवात
ब्लू टिकची सेवा सर्वप्रथम ट्विटरने सुरू केली होती, जी केवळ लोकप्रिय लोकांसाठी राखीव होती. इंस्टाग्रामने यापूर्वी मीडिया संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांना, प्रभावशाली व्यक्तींना, सेलिब्रिटींना आणि राजकारण्यांना त्यांच्या नावापुढे ब्लू टिक लावण्याची परवानगी दिली होती. आता कोणताही यूजर्स ते खरेदी करू शकतो.
ब्लू टिक कोणाला मिळेल त्याची प्रक्रिया काय
इंस्टाग्रामवर ब्लू टिक्स खरेदी करण्यासाठी, वापरकर्त्याचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे, त्यांचा फोटो आयडी सबमिट करणे आणि व्हेरिफिकेशन प्रक्रियेतून जाणे आवश्यक आहे. मेटा वर एकदा यूजर्सची पडताळणी झाल्यानंतर त्याला त्याचे प्रोफाईल नाव किंवा डिस्प्ले नाव किंवा प्रोफाइलवरील इतर कोणतीही माहिती बदलणे सोपे होणार नाही. यूजर्सला पुन्हा पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल.
मीडिया रिपोर्ट्सवर विचार केला तर जे वापरकर्ते आधीपासूनच Instagram आणि Facebook वर सत्यापित आहेत त्यांना Meta च्या सशुल्क सत्यापन योजनेसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. परंतू मेटा लेगेसी खात्यांपासून मुक्त होण्याची योजना आखत असल्यास यात नियम बदलले जाऊ शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.