• Home
  • Business
  • Facebook may buy 10% stake in Reliance Jio, sale for debt redemption

फेसबूक जिओची 10% भागिदारी विकत घेण्याची शक्यता, कर्जमुक्तीसाठी होत आहे विक्री

  • सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे रिलायन्स जिओ

दिव्य मराठी

Mar 26,2020 10:13:00 AM IST

नवी दिल्ली - सोशल मिडिया क्षेत्रातील दिग्गज अमेरिकी कंपनी फेसबूक देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रियायन्स जिओची १० टक्के भागिदारी विकत घेण्याची शक्यता आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत उपकंपनी असलेल्या जिओला कर्जमुक्त करण्याचे रिलायन्स समूहाचे ध्येय आहे.


वृत्तानुसार, रिलायन्स जिओची भागिदारी विकत घेण्याचा फेसबूक विचार करत आहे. रिलायन्स जिओचे मुल्यांकन ६० अब्ज डॉलर्स म्हणजे ४.५ लाख कोटी असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. दरम्यान वृत्ताबाबत फेसबूक आणि रिलायन्स जिओने कुठलिही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र लॉकडाऊन सुरू असल्यामुळे हा करार लांबण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.


सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे रिलायन्स जिओ

ट्रायच्या तज्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०१९ पर्यंत रिलायन्स जिओ ३७ कोटी ग्राहकांसह सर्वात मोठी कंपनी आहे. तर दिग्गज सोशल मिडिया कंपनी फेबबुकने भारतात ३४ कोटी सक्रीय यूजर्स बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. स्टेटिस्टानुसार, २०१८ मध्ये फेसबुककडे २८ कोटी सक्रीय मासिक युजर्स होते.

X