आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करार:फेसबुकचा भारतीय म्युझिक कंपनी सारेगामासोबत जागतिक करार; युजर पोस्ट, प्रोफाइलमध्ये 1 लाख गाण्यांचा वापर शक्य

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेसबुकसह इन्स्टाग्रामचे युजरही कंटेंटमध्ये सदाबहार गाण्यांचा वापर करू शकतील

अव्वल सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना भारतीय गाण्यांची मोठी यादी उपलब्ध करून देण्यासाठी सारेगामाबरोबर जागतिक करार केला आहे. याअंतर्गत सारेगामाचे संगीत फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ आणि इतर पोस्टसाठी वापरता येईल. वापरकर्त्यांना फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिओ, स्टोरी, स्टिकर आणि इतर सर्जनशील कंटेटसाठी संगीताचा वापर करण्याची परवानगी असेल.

अलीकडच्या काळात फेसबुक भारतीय कंपन्यांशी सातत्याने भागीदारी करत आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकने जिओबरोबर करार केला आहे. फेसबुक इंडियाचे संचालक प्रमुख मनीष चोप्रा म्हणाले, फेसबुकवरील संगीत हा अभिव्यक्तीचा अविभाज्य भाग आहे आणि यामुळे लोक जवळ येतात, असा आमचा विश्वास आहे. सारेगामाबरोबर भागीदारी करण्याचा आम्हाला अभिमान आहे. यामुळे आमच्या प्लॅटफॉर्मवर लोकांना जागतिक स्तरावर आवडते भारतीय संगीत ऐकायला मिळेल. ते म्हणाले की, नवीन भागीदारीमुळे फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना सारेगामाच्या यादीतील गाणी वापरता येतील. यात चित्रपटातील गाणी, भक्तिसंगीत, गझल आणि इंडिपॉप या शैलीतील १,००,००० हून जास्त गाणी आहेत. हे व्हिडिओ व कथांमध्ये २५ हून जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे. सारेगामा जगातील सर्वात जुन्या म्युझिक कंपन्यांपैकी एक आहे. यात लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार, आशा भोसले, गुलजार, जगजित सिंग, आरडी बर्मन, कल्याणजी आनंदजी, गीता दत्त आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासारख्या दिग्गजांंची गाणी आहेत. टी-सिरिज, यशराज फिल्म्स आणि झी म्युझिकसोबत यापूर्वीही असे करार केले आहेत.

करारामुळे सारेगामाच्या समभागात २० टक्के वाढ

फेसबुक सोबतच्या करारामुळे सारेगामाला फायदा झाला आहे. बीएसईमध्ये कंपनीच्या समभागात बुधवारी २० टक्के वाढ झाली असून यांचा भाव प्रतिशेअर ३३३.९५ रुपये झाला. सारेगामाच्या समभागात मागील काही महिन्यांत एका दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. गेल्या ५२ आठवड्यांमध्ये सारेगामाचे समभाग जास्तीत जास्त ५८० रुपयांपर्यंत पोहोचले होेते.

बातम्या आणखी आहेत...