आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर गाइड:वायुसेनेच्या आवडत्या करिअरमध्ये समाविष्ट आहे फायटर पायलट, पीएबीटीसाठी मिळते एक संधी

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फायटर पायलट म्हणून करिअरची निवड करण्यापूर्वी सामान्य पायलट आणि फायटर पायलट यामधील फरक समजून घेणे योग्य राहील. फायटर पायलटची निवड फक्त भारतीय वायुसेना आणि नौदलात होते, तर कमर्शिअल पायलट खासगी एअरलाइन्समध्ये असतात. तथापि, भारतीय वायुसेनेचे सर्व पायलट फायटर पायलट नसतात. वायुसेनेत तुमची निवड जर फ्लाइंग ब्रँचमध्ये झाली तर तुम्हाला फायटरऐवजी ट्रान्सपोर्ट किंवा हेलिकॉप्टर पायलट बनवले जाऊ शकते. साधारणपणे असा समज आहे की एनडीए, एफकॅट परीक्षांच्या माध्यमातून फायटर पायलट बनता येते, मात्र या परीक्ष उत्तीर्ण झाल्यानंतरही तुम्ही फायटर पायलटच व्हाल, याची शक्यता नसते. लेखी परीक्षा आणि एसएसबी मुलाखत उत्तीर्ण केल्यानंतर तुमची निवड फ्लाइंग ब्रँचमध्ये होते. त्यावेळी तुम्ही फायटर पायलट बनण्याची शक्यता वाढते. यासाठी पायलट म्हणून तुमची कामगिरी पाहिली जाते. फायटर पायलट म्हणून निवड झाल्यानंतर बेसिक आणि ऑपरेशनल ट्रेनिंग दिली जाते. त्यानंतर तुम्ही युद्धासाठी पूर्णपणे तयार होता.

एनडीए आणि एफकॅट परीक्षेद्वारे होऊ शकते निवड संरक्षण प्रशिक्षण तज्ञ कर्नल अशोकन यांच्यानुसार, भारतीय वायुसेनेच्या फ्लाइंग ब्रँचमध्ये दाखल होण्याचा पहिला मार्ग एनडीए परीक्षा आहे. बारावी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र) पात्र विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. याशिवाय एफकॅट परीक्षेद्वारेही पायलट बनण्याची संधी मिळते. विज्ञान आणि अभियांत्रिकीतून पदवीधर विद्यार्थी एफकॅट परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

सामान्यापेक्षा अधिक आव्हाने ट्रान्सपोर्ट पायलट हे पुरवठा आणि उपकरणांची वाहतूक करतात. त्यांना डोंगराळ भागातच एयरक्राफ्ट लँड करावे लागू शकते. फायटर पायलट विमानाच्या उड्डाणासह वेळ पडल्यास त्याचा वापर शस्त्रासारखाही करू शकतात.

कठोर प्रशिक्षणाने फ्लाइंग शिकता येते तुमचे हात, पाय आणि बुद्धीने एकत्रित काम करणे पायलट बनण्यासाठी आवश्यक असते. ही क्षमता तपासण्यासाठी उमेदवारांना पीएबीटी (पायलट अॅप्टिट्यूड अँड बॅटरी टेस्ट) असते. पीएबीटीमध्ये तुमची ऐकण्याची क्षमता, पायांच्या हालचालींचे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. एसएसबी मुलाखतीदरम्यान फ्लाइंग ब्रँचची निवड करणाऱ्या उमेदवारांना या चाचणीला सामोरे जावे लागते. यात तुमच्या हालचालींसह तुम्ही डायल रीड करू शकता की नाही, याचीही तपासणी केली जाते. ही चाचणी देण्याची तुम्हाला फक्त एकच संधी असते. तज्ञांच्या मते, पायलटच्या करिअरमध्ये अनेक आव्हाने असतात. तथापि, कठोर प्रशिक्षण आणि सरावाच्या माध्यमातून ही आव्हाने पेलण्यासाठी तुम्हाला सक्षम बनवले जाते.

बातम्या आणखी आहेत...