आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबँक ऑफ बडोदा आणि HDFC या देशातील दोन मोठ्या बँकांनी मुदत ठेवींवरील (FD) व्याजात वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदाचे नवीन व्याजदर 16 जूनपासून लागू झाले आहे, तर HDFC चे व्याजदर 17 जूनपासून लागू झाले आहेत.
बँक ऑफ बडोदामध्ये एफडी केल्यास किती मिळेल व्याज
कालावधी | व्याज दर (% मध्ये) |
7 ते 45 दिवस | 2.80 |
46 ते 180 दिवस | 3.70 |
181 ते 270 दिवस | 4.30 |
271 दिवस ते 1 वर्षाहून कमी | 4.40 |
1 वर्ष | 5.00 |
1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षे | 5.45 |
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे | 5.50 |
3 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे | 5.35 |
HDFC मध्ये FD केल्यास आता किती मिळेल व्याज
कालावधी | व्याज दर (% मध्ये) |
7 ते 29 दिवस | 2.75 |
30 ते 90 दिवस | 3.25 |
91 दिवस ते 6 महिने | 3.75 |
6 महिने 1 दिवस ते 9 महिने | 4.65 |
9 महिने 1 दिवस ते 1 वर्षाहून कमी | 4.65 |
1 वर्ष | 5.35 |
1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षे | 5.35 |
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे | 5.50 |
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे | 5.70 |
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे | 5.75 |
FD मधून मिळणाऱ्या व्याजावरही कर द्यावा लागतो
एका आर्थिक वर्षात बँक एफडीवर मिळणारे व्याज ४० हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. ही मर्यादा 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी आहे. त्याच वेळी, 60 वर्षांवरील म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीमधून 50 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न असल्यास मोफत ठेवण्यात आले आहे. यापेक्षा जास्त उत्पन्नावर 10% TDS कापला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.