आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • FIFA World Cup Livestream Reaction I India Football Fans On JioCinema App I Latest News And Update 

फुटबॉल वर्ल्डकपच्या लाइव्ह स्ट्रीमिंगवर जिओ ट्रोल:यूजर्स म्हणाले- मॅच पाहणे डोकेदुखी ठरतेय, कंपनीने व्हिडिओ शेअर करून माफी मागितली

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबॉल वर्ल्डकप 20 नोव्हेंबरपासून म्हणजे रविवारपासून सुरू झाला आहे. 20 नोव्हेंबर रोजी यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात पहिलाच सामना खेळला गेला. स्पोर्ट्स 18 हा सामना भारतात प्रसारित करत आहे. तर OTT प्लॅटफॉर्मवर तो जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.

पहिल्या सामन्यात ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे सामना पाहणाऱ्या भारतीय प्रेक्षकांना बफरिंगमुळे त्रासाला सामोरे जावे लागले. यावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर जिओ सिनेमाला ट्रोल करून जोरदार टीका केली.

जिओ सिनेमानेही मजेशीर व्हिडिओ शेअर करून दिले उत्तर
युजर्सनी विविध मीम्सच्या माध्यमातून जिओ सिनेमाला ट्रोल केले. तथापि, यानंतर जिओ सिनेमाने देखील टिकटॉक व्हिडिओ शेअर करून वापरकर्त्यांची विनोदी पद्धतीने माफी मागितली. तर जिओची टीम बफरिंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करित आहे. जिओ सिनेमाने खालील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर ज्यामध्ये आमची टीम तुम्हाला येत असलेल्या बफरिंग समस्या सोडवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.

जिओ सिनेमाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जिओ सिनेमाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जिओ सिनेमाने सांगितले की, आम्ही तुम्हाला सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी सतत काम करत आहोत. FIFA विश्वचषक कतार 2022 चा आनंद घेण्यासाठी कृपया तुमचे अ‌ॅप अपग्रेड करा. कोणत्याही गैरसोयीबद्दल क्षमस्व.

जिओ सिनेमावर फुटबॉल मॅच पाहताना युजरने डोकेदुखी म्हटले
युजरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. त्याचबरोबर लिहिले की, वर्ल्डकपच्या प्रसारणाची ही आतापर्यंतची सर्वात वाईट सुरुवात आहे. याच्या खाली त्याने एक फोटो शेअर करून सांगितले की, त्यामुळे खूप डोकेदुखी झाली आहे. याचे एक कारण म्हणजे जिओ सिनेमावर सामना पाहणे.

याशिवाय काल अनेक मीम्स व्हायरल होत होते, यूजर्सने जिओ कंपनीवर नाराजी व्यक्त केली आहे.

20 नोव्हेंबरपासून वर्ल्ड कपला सुरुवात झाली
रविवार 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 ला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत 32 संघ सहभागी होत आहेत. बक्षीस रकमेच्या बाबतीत ही जगातील तिसरी सर्वात मोठी स्पर्धा आहे. यापेक्षा जास्त रक्कम UEFA चॅम्पियन्स लीग फुटबॉल (10.6 हजार कोटी रुपये) आणि फॉर्म्युला-1 मोटर स्पोर्ट्स (6.5 हजार कोटी रुपये) मध्ये उपलब्ध आहे. यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात सलामीचा सामना झाला. या सामन्यात इक्वेडोरने कतारचा 2-0 असा पराभव केला. दोन्ही गोल इक्वेडोरचा कर्णधार आणि स्ट्रायकर एनर व्हॅलेन्सियाने केले.

बातम्या आणखी आहेत...