आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Finance Minister Likely To Inform Media About The Decisions On Bad Bank, Will Chair GST Council Meeting Tomorrow; News And Live Updates

बँकिंग क्षेत्रासाठी मोठी घोषणा:केंद्र सरकारतर्फे 30,600 कोटींच्या तरतुदीची घोषणा, बॅड लोनच्या बदल्यात दिली जाणार सिक्योरिटी रिसीट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने बँकिंग क्षेत्रातील डबघाईला आलेल्या बँकांना पाठिंबा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात इतर क्षेत्रासह बँकिंग क्षेत्रानाही मोठा फटका बसला होता. याच पार्श्वभूमीवर या बँकांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे जारी करण्यात आलेल्या बॅड लोनच्या बदल्यात सिक्योरिटी रिसीट दिली जाणार आहे. यासाटी केंद्र सरकारने 30 हजार 600 कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली आहे अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीसोबतच इंडिया डेट रिझोल्यूशन कंपनीची (आयडीआरसीएल) स्थापना करण्यात येत आहे. NARCL मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे 51% हिस्सा असेल तर IDRCL मध्ये सरकारी वित्तीय संस्थांचे 49% हिस्सा असणार आहे.

सिक्योरिटी रिसीटवर 5 वर्षाची सरकारी गॅरंटी
गॅरंटीचे पैसै बॅड बँक किंवा अॅसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीला तेंव्हाच मिळणार जेव्हा बॅड लोनचे रिझोल्यूशन किंवा लिक्विडेशन झालेले असेल. यावर सरकारकडून सिक्योरिटी रिसीट म्हणून 5 वर्षाची गॅरंटी दिली जाईल. एनएआरसीएलला एकूण 2 लाख कोटी बॅड लोन दिली जातील. पहिल्या टप्प्यात 90,000 कोटी रुपयांची बॅड लोन हस्तांतरित केले जाणार आहे.

सरकारी हमीमुळे मोकळा झाला बॅड बॅकेंचा रस्ता
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बुडीत कर्जासाठी भरपूर तरतूद करावी लागत आहे असे अर्थमंत्र्यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर बॅड लोनचा रस्ता मोकळा करणे खूप गरजेचे आहे. बॅड लोन जारी होत असलेल्या सिक्योरिटीला सरकारची गॅरंटी मिळाल्यामुळे बॅड बँक उघडण्याचा रस्ता मोकळा झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...