आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी (16 ऑक्टोबर) डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीबाबतचे विधान केले आहे. अर्थमंत्री सीतारामन सद्या अमेरिकेत असून त्या ठिकाणी सुरू असलेल्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.
अर्थमंत्री सीतारामन यांना प्रश्न विचारला गेला की, रूपया कमकुवत होत आहे. त्या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की, रुपया कमजोर नसून डॉलर मजबूत होत आहे. एवढेच नाही तर इतर उदयोन्मुख बाजारातील चलनांच्या तुलनेत रुपयाने खूपच चांगली कामगिरी केली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया नेहमीच कमी आहे
मुळात अर्थमंत्र्यांचे हे विधान अशा काळात म्हटले आहे की, जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आहे. शुक्रवारी रुपया 12 पैशांनी घसरून 82.36 प्रति डॉलरवर बंद झालेला होता.
रूपयांच्या सततच्या घसरणीबाबत प्रश्न
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अर्थमंत्री सध्या अमेरिकेत आहेत. दरम्यान, वॉशिंग्टन डीसीमध्ये पत्रकार परिषदेत त्यांना रुपयाच्या सततच्या घसरणीबाबत प्रश्न विचारण्यात आला.
तेव्हा निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पहिली गोष्ट म्हणजे रुपयाची घसरण होताना मला दिसत नाही. डॉलर मजबूत होताना मला दिसत आहे. त्यामुळे साहजिकच ती चलन कमकुवत होतील ज्यांच्या तुलनेत डॉलर मजबूत होत आहे.
रुपयाची घसरण रोखण्यासाठी RBI प्रयत्न करेन
निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, भारतीय रुपया इतर उदयोन्मुख बाजारातील चलनांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहे. मात्र, रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.