• Home
 • Business
 • Finance Minister Nirmala Sitharaman said, the government is working on the economic package

आयकर रिटर्न भरणा, आधार-पॅन लिंक करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ; सकंटग्रस्त उद्योगांना लवकरच पॅकेज -अर्थमंत्री

 • 31 मार्च पर्यंत कुठल्याही एटीएमवरून पैसे काढल्यास चार्ज लागणार नाही
 • कोरोना संक्रमण, लॉकडाउनमुळे आर्थिक मंदीच्या दिशेने जात आहे भारत

दिव्य मराठी वेब टीम

Mar 24,2020 05:40:21 PM IST

नवी दिल्ली - कोरोव्हारसमुळे अख्ख्या देशात लॉकडाउन आहे. सरकारने लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि उद्योगांना मदतीचा हात देण्यासाठी काम सुरू केल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. अर्थमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, संकटात सापडलेल्या उद्योगांना पॅकेज जारी करण्यासाठी मंत्रालय सध्या काम करत आहे. लवकरच यावर घोषणा केली जाईल. सोबतच, आयकर रिटर्न भरण्याची तारीख आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सामान्य नागरिकांसाठी 4 घोषणा

 • 3 महिन्यांपर्यंत कुठल्याही एटीएमवरून पैसे काढण्यास चार्ज लागणार नाही
 • खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणे आता बंधनकारक नाही
 • आयटीआर रिटर्न फाइल करण्यासाठी 30 जून पर्यंतची मुदवाढ
 • पॅन-आधार लिंक करण्याची तारीख सुद्धा 30 जून पर्यंत वाढली


उद्योगांना दिलासा देण्यााठी केलेल्या घोषणा

 • टीडीएसमध्ये विलंब झाल्यास लागणाऱ्या व्याजावर 18 टक्क्यांचे दर कमी करून 9 टक्के केले
 • आर्थिक वर्ष 2018-19 साठी आयकर भरण्याची तारीख 30 जून पर्यंत वाढवली
 • वाद ते विश्वास योजनेची मुदत सुद्धा 30 जून पर्यंत राहील
 • 5 कोटी रुपयांपेक्षा कमी वार्षिक टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना जीएसटी फायलिंगवर कुठलाही व्याज नाही. मार्च-एप्रिल-मे महिन्यात फायलिंगची तारीख 30 जून पर्यंत वाढली
 • आयात-निर्यात करणाऱ्यांना दिलासा, कस्टम क्लिअरेंस आता 30 जून पर्यंत आवश्यक सेवांमध्ये सामिल, 24 तास काम करेल
 • यावर्षी कंपन्यांच्या संचालकांना 182 दिवस देशात राहण्याच्या बंधनाला शिथिल करण्यात आले
 • एक कोटी रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कंपन्यांच्या विरोधात आर्थिक दिवाळखोरीची प्रक्रिया चालणार नाही


कोरोना संक्रमणामुळे आर्थिक मंदीच्या दिशेने भारत

कोरोना व्हायरस देशात येण्यापूर्वी अर्थव्यवस्था थोडीशी सुधरण्यास सुरुवात झाली होती. परंतु, कोरोना भारतात येताच देशाची अर्थव्यवस्था आता मंदीच्या दिशेने जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये कर्फ्यू आणि लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे, उद्योग आणि व्यापर पूर्णपणे ठप्प झाले आहे.

X