आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Finance Minister To Present Jammu And Kashmir Budget: Third Budget After Deletion Of Sections 370 And 35A, Afternoon Discussion | Marathi News

जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प सादर करतील अर्थमंत्री:कलम 370 आणि 35A हटवल्यानंतरचा तिसरा अर्थसंकल्प, दुपारनंतर चर्चा

नवी दिल्‍ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवार पासून सुरू झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत जम्मू आणि काश्मीरचा अर्थसंकल्प सादर करतील. केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर जम्मू-काश्मीरचा हा तिसरा अर्थसंकल्प असेल. दुपारी मध्यांतरानंतर या अर्थसंकल्पावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सुमारे 1.10 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील शहरी आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात करण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी 17 मार्च 2021 रोजी जम्मू-काश्मीरचा दुसरा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. कलम 370 हटवल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला होता.

फेब्रुवारी 2020 मध्ये पहिला अर्थसंकल्प

5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीर मधून कलम 370 आणि 35A हटवण्यात आले. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आहे. केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी जम्मू-काश्मीरचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. केंद्रीय अर्थसंकल्प 2020 मध्ये जम्मू-काश्मीर साठी 30,757 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ​​अर्थसंकल्पाची सुरुवात अर्थमंत्र्यांनी एका कवितेच्या माध्यमातून केली होती. अर्थमंत्री म्हणाल्या होत्या, 'एका काश्मिरी कवितेच्या माध्यमातून मी अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करणार आहे.'

बातम्या आणखी आहेत...