आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बँक कर्मचारी अश्विन गुप्ता(३३) पत्नी श्रुती(३१) आणि मुले रचित(४ )व सिमरन(२) या मुलासह जपयूरमध्ये राहतात. दोघे दरमहा ९५,००० रु. कमावतात. त्यांची बचत २७,००० महिना आहे. यातून १० हजार इक्विटी फंडात, ५ हजार पीपीएफमध्ये आणि ६ हजार एसएसवायमध्ये गुंतवतात. त्यांना आपल्या पोर्टफोलिओत काय केला पाहिजे?
पोर्टफोलिओचा आढावा आणि सल्ला
- गुप्ता दांपत्य तरुण आहे आणि घर खरेदीशिवाय त्यांचे अन्य उद्दिष्ट दीर्घावधीतील आहे. मात्र, त्यांच्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ त्यंाची जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार नाही.
- दीर्घावधीच्या उद्दिष्टासाठी इक्विटी फंडाची शिफारस केली जाते. घसरणीत एसआयपी बंद करणे मोठी चूक आहे. याकडे समान पैशात जास्त युनिट्स खरेदी करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे.
- सोन्याने अलिकडे चांगली कामगिरी केली आहे, मात्र याचा दीर्घावधीचे रेकॉर्ड खराब आहे. सोन्याऐवजी, इक्विटी फंडात एसआयपी सुरू करण्यासाठी पैसे वापरा.
- उत्पन्न वाढण्यासोबत एसआयपी दरवर्षी वाढवली पाहिजे. आम्ही दरवर्षी एसआयपी रकमेस ५% वाढीचा सल्ला देत आहोत.
- काही वर्षांनी दोन्ही मुलांचे औपचारिक शिक्षण सुरू होईल. गृह कर्जानंतर अतिरिक्त रक्कमही कमी होईल. खर्चात कपात करून मासिक गुंतवणूक ४०, हजार पर्यंत वाढवावी.
- दांपत्याला टर्म इन्शुरन्स घेण्याची गरज आहे. अश्विन यांच्यासाठी १ कोटी रु. आिण श्रुतींसाठी ५० लाख रुपयांच्या विमा कव्हरवर दरवर्षी २१,००० रु. खर्च येईल.
- कंपनीचा ग्रुप हेल्थ विमा असल्याने त्यांनी ५ लाखाचा फ्लोटर आरोग्य विमा घ्यावा.
राज खोसला, एमडी, मायमनीमंत्रा
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.