आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Financial Planning ; Retirement Planning ; Insurance ; Start Your Investment From The First Salary, Along With Planning For Retirement, Taking Health Insurance Will Also Be Right

आर्थिक नियोजन:पहिल्या पगारापासूनच सुरु करा गुंतवणूक, नोकरीला लागताच सर्वांनी करायला हवीत ही 5 आवश्यक कामे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्या तुम्ही नोकरी मिळताच करायला हव्या.

नोकरी मिळताच आपण आपल्या आर्थिक उद्दीष्टांचा विचार केला पाहिजे. सेवानिवृत्तीनंतर आपल्या गरजा भागविण्यासाठी आपल्याला इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये, यासाठी सेवानिवृत्तीचे नियोजन करणे फार महत्वाचे आहे. याशिवाय भविष्यातील गरजा भागवण्यासाठी पहिल्या पगारापासूनच गुंतवणूक सुरू केली पाहिजे. तरुण वयातच गुंतवणूक सुरू केल्याने आपण अधिक सहजतेने मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यास सक्षम व्हाल. आज आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्या तुम्ही नोकरी मिळताच करायला हव्या.

  • गुंतवणूक करणे आवश्यक आहे

एखाद्याने आपली पहिली नोकरी सुरू करताच गुंतवणूकीबद्दल विचार केला पाहिजे. खर्चानंतर आपल्या हातात जे पैसे शिल्लक राहतात ते आपल्या पद्धतीने गुंतवायला हवे. यावेळी सुरू केलेली गुंतवणूक आपले भविष्य सुरक्षित करू शकते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ), म्युच्युअल फंड किंवा आरडीसह इतरत्र गुंतवणूक करून सहजपणे मोठ्या रक्कमेची भविष्यासाठी तरतुद करणे शक्य होऊ शकते.

तथापि, तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही तरुण वयात गुंतवणूक करत असाल तर तुम्ही इक्विटी लिंक योजनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे जेणेकरून आपल्याला गुंतवणूकीवर अधिक चांगला परतावा मिळेल. यासाठी आपण आर्थिक तज्ज्ञांचा सल्लादेखील घेऊ शकता.

  • आपत्कालीन निधी तयार करणे आवश्यक आहे

सेवानिवृत्तीसाठी पैसे जोडण्याव्यतिरिक्त, आपणास नोकरी जाण्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी देखील तयार असले पाहिजे. हा इमर्जन्सी फंड आपल्या किमान 5 ते 6 महिन्यांच्या पगाराइतका असावा. हे आपल्याला कोरोनासारख्या वाईट काळाचा सामना करण्यास मदत करेल.

  • सेवानिवृत्तीसाठी शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करा

सेवानिवृत्तीसाठी बचत सुरू करण्याची योग्य वेळ म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचा पहिला पगार मिळतो. तुम्ही जेवढी उशीरा गुंतवणूक सुरु कराल, तेवढे जास्त पैसे तुम्हाला निश्चित रक्कम जोडण्यासाठी गुंतवावे लागतील.

समजा, जर एखादी 25 वर्षीय व्यक्ती वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्तीपर्यंत 1 कोटी रुपये जमा करण्याची योजना आखत असेल, आणि जर त्याला गुंतवणुकीवर वार्षिक 12% रिटर्न मिळत असेल तर त्याला दरमहा सुमारे 2 हजार रुपये गुंतवावे लागतील. तर वयाच्या 45 व्या वर्षीपासून गुंतवणूक करण्यास सुरु केली, तर त्या व्यक्तीला दरमहा 12 हजार रुपये गुंतवावे लागतील.

आरोग्य विमा घेणे असेल योग्य
कोरोनाने लोकांना आरोग्य विम्याचे महत्त्व पटवून दिले आहे. हे आपल्या वाईट काळात उपयोगाला येते आणि आजारी पडल्यास सेव्हिंग उपचारांवर खर्च करण्याची वेळ येऊ देत नाही. आरोग्य विमा आपल्याला योग्य उपचार मिळवण्यात मदत करते. आपण तरुण वयात आरोग्य विमा घेतल्यास त्याकरिता आपल्याला कमी प्रीमियम भरावे लागेल.

शक्य तितक्या लवकर कर्जातून मुक्त व्हा
आपण आपल्या अभ्यासासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी कर्ज घेतलेले असल्यास, शक्य तितक्या लवकर त्यातून मुक्त व्हा. कारण आपल्याला त्यावर व्याज द्यावे लागते. इनकम सुरु होताच कर्ज लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...