आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Fixed Deposit FD Break Penalty And Time Limit; Six Things You Should Know; News And Live Updates

कामाची गोष्ट:FD करण्यापूर्वी कालावधी आणि त्यावरील कर यासह 6 गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होई शकते मोठे नुकसान

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • FD वर मिळणाऱ्या व्याजावर भरावा लागतो कर

सुरक्षित आणि हमी परताव्यामुळे मुदत ठेवीला (FD) गुंतवणुकीचे एक चांगले साधन मानले जात आहे. परंतु, याबाबत काहीही विचार न करता गुंतवणूक करणेदेखील योग्य नाही. कारण एफडी करण्यापूर्वी त्यांचा कालावधी त्यावरील कर आणि एफडी मोडताना लागणारे दंड याबाबत जाणून घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला याचे मोठे परिणाम भोगावे लागू शकते. चला तर जाणून घेऊया की, एफडीसंदर्भांत अशा 6 गोष्टी कोणत्या आहेत. ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

योग्य कार्यकाळ निवडणे महत्वाचे
एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी याचा कार्यकाळ किती आहे? याबाबत विचार करणे खूप गरजेचे आहे. कारण गुंतवणूकदारांनी मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढले तर त्यांना दंड भरावा लागेल. मुदतपूर्तीपूर्वी FD मोडल्यास 1% पर्यंत दंड आकारला जाईल. यामुळे ठेवीवर मिळणारे एकूण व्याज कमी होऊ शकते. त्यामुळे एफडी घेण्यापूर्वी या गोष्टींचा सर्वात आधी विचार करावा.

एकाच FD मध्ये संपूर्ण पैसे गुंतवू नका
जर तुम्ही कोणत्याही एका बँकेत 10 लाख रुपये FD मध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल तर थांबा. त्याऐवजी 1 लाख रुपयांच्या 8 FD आणि 50 हजाराच्या 4 FD एकापेक्षा जास्त बँकांमध्ये गुंतवा. कारण यामुळे खूप मोठा फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला मधातच पैशाची गरज भासली तर तुम्ही गरजेनुसार एक एफडी मोडू शकता. इतर सर्व एफडी तुमच्या सुरक्षित राहतील.

FD वर मिळणाऱ्या व्याजावर भरावा लागतो कर
आयकर स्लॅबनुसार, तुमच्या FD वर मिळणाऱ्या व्याजावरदेखील कर आकारला जातो. एफडीवर मिळणारे व्याज एका वर्षात 10 हजारांवर असेल तर त्यावर टीडीएस कपात होते. हे कपात एकूण मिळणाऱ्या व्याजाच्या 10% असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50 हजार आहे. तथापि, जर तुमचे उत्पन्न करपात्र श्रेणीपेक्षा कमी असेल तर तुम्ही FD वर टीडीएस कपातीला परवानगी न देण्यासाठी फॉर्म 15G आणि फॉर्म 15H सबमिट करू शकता.

व्याज काढणे
बँकांमध्ये यापूर्वी तिमाही आणि वार्षिक आधारावर व्याज काढण्याचा पर्याय होता. परंतु, आता काही बँकांमध्ये मासिक पैसे काढू शकता. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला त्याची निवड करता येऊ शकते.

वेळेपूर्वी FD मोडल्यास भरावा लागेल दंड
जर तुम्ही वेळेपूर्वी FD मोडत असाल तर तुम्ही ज्या दराने एफडी केली आहे, त्या दराने तुम्हाला व्याज मिळणार नाही. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 1 वर्षासाठी 6% दराने 1 लाख रुपयांची FD केली, पण तुम्ही ती फक्त 6 महिन्यांनंतर मोडली आणि 6 महिन्यांच्या FD वर 5% वार्षिक दराने व्याज मिळत आहे. तर बँका तुम्हाला 6% ऐवजी 5% दराने व्याज देतील. देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने 5 लाख रुपयांपर्यंत FD केली आणि त्याने मुदतपूर्वी एफडी मोडली तर त्याला 0.50% दंड भरावा लागेल. अवधीनुसार दंडाच्या रक्कमेत वाढ होते.

FD वर घेता येईल कर्ज
विशेष म्हणजे तुम्हाला तुमच्या FD वरदेखील कर्ज घेऊ शकता. या अंतर्गत FD च्या मूल्याच्या 90% पर्यंत कर्ज मिळू शकते. समजा तुमच्या एफडीचे मूल्य 1.5 लाख रुपये आहे, तर तुम्हाला 1 लाख 35 हजार रुपयांचे कर्ज मिळू शकते. जर तुम्ही FD वर कर्ज घेतले तर तुम्हाला FD वरील व्याजापेक्षा 1-2% जास्त व्याज द्यावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...