आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Fixed Deposit Interest Rates Vs SBI Bank; Today Is Last Day Of SBI Special Scheme; News And Live Updates

आपल्या फायद्याची गोष्ट:SBI च्या विशेष योजनाचा आज शेवटचा दिवस, कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ; FD वर मिळणार जास्त व्याज

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'प्लॅटिनम ठेव योजनेत' मिळणार जास्त व्याज

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गेल्या महिन्यात स्वातंत्र्यदिनी विशेष ऑफर सुरू केली. या ऑफरनुसार, भारतीय स्टेट बँकेने डिपॉझिटवर जास्त व्याज देण्याबरोबरच कर्जावरील प्रोसेसिंग शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, ही ऑफर आज 14 सप्टेंबर रोजी संपणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला एफडी मिळवायची असेल किंवा कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

'प्लॅटिनम ठेव योजनेत' मिळणार जास्त व्याज
भारतीय स्टेट बँकेने 15 ऑगस्ट रोजी 'एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट' योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला सामान्य ठेवींच्या तुलनेत 0.15% जास्त व्याज मिळेल. या योजनेचा लाभ 75 दिवस, 525 दिवस (75 आठवडे) आणि प्लॅटिनम 2250 दिवसांच्या (75 महिने) गुंतवणुकीवर उपलब्ध असेल. एसबीआय सध्या ठेवींवर (FD) जास्तीत जास्त 5.40% व्याज देत आहे.

कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ
एसबीआयने 14 सप्टेंबरपर्यंत गृह, वैयक्तिक, कार आणि सुवर्ण कर्जावर प्रोसेसिंग फी न आकारण्याचा निर्णय घेतला होता. या व्यतिरिक्त इतर कर्जावर ही तुम्हाला विशेष सवलत दिली जाणार आहे.

या योजनेत किती व्याज मिळेल?

कालावधीसाधारणपणे व्याज दर (%)ऑफर अंतर्गत व्याज दर (%)
75 दिवस3.904.05
525 दिवस4.905.05
2250 दिवस5.405.55
बातम्या आणखी आहेत...