आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Flipkart Amazon Sale From 23rd Septenber I Know The Terms And Conditions On Payment From BNPL I Latest News And Update 

'बाय नाऊ-पे-लेटर' हा सापळा नाही ना:23 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट-अ‌ॅमेझॉनचा सेल; BPNL पेमेंट करताना नियम जाणून घ्या, अन्यथा होईल कर्ज

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज (23-30 सप्टेंबर) आणि अ‌ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवलसाठी (23 सप्टेंबर) अवघे काही दिवस उरले आहेत. मोबाईल फोन, कपडे आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सुट मिळणार आहे. क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीसाठी वेगळी सवलत उपलब्ध असणार आहे. त्याचवेळी, क्रेडिट कार्डने देखील खरेदी करणे खूप सोपे केले आहे. कारण ते ईएमआयमध्ये पेमेंट करण्याची सुविधा देते. शिवाय अनेक ऑनलाईन खरेदीदार आजकाल Buy Now Pay Later (BNPL) सारखे पर्याय वापरत आहेत.

बाय नाऊ पे लेटर (BNPL) सेवेने अनेक तरुण खरेदीदारांना प्रभावित केले आहे. वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेण्यापेक्षा BNPL योजना अधिक आकर्षक दिसते. कारण त्यात शून्य टक्के व्याजाचा दावा केला जातो. या सुविधेचा लाभ घेण्याची प्रक्रियाही सोपी आहे. याशिवाय ईएमआयमध्ये पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. बीएनपीएल कंपन्या तुम्हाला व्याजाशिवाय कर्जाची परतफेड करण्यासाठी काही दिवसांची मुदत देतात. तथापि, त्याच्या अटी जाणून घेतल्याशिवाय, त्याचा फायदा घेणे जबरदस्त असू शकते. आज आम्ही तुम्हाला बीएनपीएलचा लाभ घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि वेळेवर पैसा न भरल्यास तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याबद्दल सांगत आहोत.

आता खरेदी करा, नंतर पे करण्याची सेवा म्हणजे काय?
BNPL ग्राहकांना EMI मध्ये पैसे भरण्याची सुविधा पुरवते. यामध्ये शुन्य टक्के व्याजदराचा दावा करण्यात आला आहे. ऑनलाइन खरेदी करताना पैसे नसल्यामुळे ग्राहक खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ शकतो. परंतु BNPL सह, ग्राहक पैसे न देता. लगेच उत्पादन खरेदी करू शकतो आणि त्याला त्याची खरेदी पुढे ढकलण्याची गरज नाही.

बीएनपीएल कंपनी अल्प व्यवहार शुल्क आकारल्यानंतर ग्राहकांच्या वतीने व्यापाऱ्याला पैसे देते. एकदा सावकार म्हणून भूमीका वटविणाऱ्या कंपनीने तुमचे पेमेंट केले की, तुम्हाला ठराविक कालावधीत रक्कम परत करावी लागेल. ते एक रकमी किंवा नो कॉस्ट ईएमआय म्हणून दिले जाऊ शकते. फ्लिपकार्ट, अ‌ॅमेझॉन आणि पेटीएम या प्रकारची सेवा देतात.

बीएनपीएल सेवा ही सुविधा की सापळा ?

  • बीएनपीएल सेवा ही सुविधा आहे की सापळा हे तुम्ही ते कसे वापरता यावर अवलंबन आहे. BNPL सुविधेसह, बरेच लोक सहसा त्यांच्या परवडण्यापेक्षा जास्त खरेदी करतात. यामुळे त्यांच्यापैकी अनेकांना नंतर पैसे भरता येत नाहीत आणि ते कर्जाच्या सापळ्यात अडकतात.
  • जर ग्राहकाने BNPL चे पेमेंट वेळेवर केले नाही, तर BNPL कंपन्या क्रेडिट स्कोअर एजन्सींना त्याची तक्रार करतात. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. त्यामुळे पुढील कर्ज मिळणे कठीण होऊ शकते. वेळेवर पैसे न भरल्यास दंडही भरावा लागतो.

अत्यंत गरजेच्या वेळीच सुविधेचा लाभ घ्या
ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे संस्थापक आणि सीईओ अर्थतज्ज्ञ पंकज मठपाल यांनी सांगितले की, ऑफर्समुळे अनेकदा उधळपट्टी होते. जर लोकांनी त्यांच्या खिशाच्या क्षमतेपेक्षा जास्त खरेदी केली तर त्यांना नंतर कर्जाची परतफेड करणे कठीण होते. म्हणून अगदी आवश्यक नसल्यास क्रेडिटवर खरेदी करणे टाळले पाहीजे.

भारतातील BNPL मार्केट किती मोठे आहे?
Goldman Sachs च्या मते, भारतीय ई-कॉमर्स उद्योग 2024 पर्यंत 99 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. वर्ल्डपेच्या ग्लोबल पेमेंट्स अहवालानुसार, BNPL सध्याच्या 3% वरून 2024 पर्यंत 9% पर्यंत वाढेल. ऑनलाईन खरेदी किंवा ई-कॉमर्स उद्योग वाढला. तर बीएनपीएलही वाढेल.

बातम्या आणखी आहेत...