आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील पहिल्या फ्लाईंग बाईकची बुकिंग सुरू झाली आहे. ही बाईक 30 मिनिटे ताशी 96 किमी वेगाने उडू शकते. या उडत्या बाईकला 'स्पीडर' असे नाव देण्यात आलेले आहे. बाईकची सुरूवातीची किंमत 3.15 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
272 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता
136 किलो वजनाची ही स्पीडर बाईक 272 किलो वजन वाहून नेण्यास सक्षम असेल. या बाईकला रिमोटने देखील कंट्रोल करता येणार आहे. फ्लाईंग बाईक अमेरिकेच्या जेटपॅक एव्हिएशन कंपनीने बनवली आहे. मूळ डिझाइनमध्ये चार टर्बाइन होते. परंतु अंतिम प्रोडक्शनमध्ये 8 टर्बाइन असणार आहे. तर दोन टर्बाइन बाईकच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कोपऱ्यात दोन असतील.
प्रमाणित होण्याची अपेक्षा
जेटपॅक एव्हिएशन जगातील पहिल्या उडणाऱ्या दुचाकीची फ्लाइट चाचणी करत आहे. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे. 2-3 वर्षात कंपनीची 8 जेट इंजिनची स्पीडर फ्लाइंग बाईक बाजारात येऊ शकते.
ही बाईक अत्यंत उपयुक्त ठरणार
कंपनीच्या म्हणण्यानुसार, फ्लाइंग बाईक प्रत्यक्षात एअर युटिलिटी व्हेइकल आहे. म्हणजेच, वैद्यकीय आणीबाणी आणि अग्निशमन यांसारख्या उद्देशांसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. कंपनी एक मालवाहू विमान म्हणून लष्करी बाजारपेठेसाठी मानवरहित आवृत्ती देखील विकसित करत आहे. ते जमिनीपासून 100 फूट उंचीवर 400 mph वेगाने उड्डाण करू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.