आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमती घसरल्‍या:ऑगस्टमध्ये एफएमसीजी क्षेत्राची विक्री 6% वाढली, तेल, पामतेलाच्या किमती 25-50% पर्यंत कमी होणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या महागाईचा वेग थांबण्याचा परिणाम दैनंदिन उपभोगाच्या वस्तूवर म्हणजेच एफएमसीजीवर झाला आहे. आॅगस्टमध्ये एफएमसीजीची विक्री जुलैच्या तुलनेत ६% वाढली. यापूर्वी या क्षेत्राने सलग तीन महिने घसरण पाहिली होेती. खरं तर रशिया-युक्रेनच्या युद्धानंतर एप्रिलमध्ये ग्राहक महागाई शिखरावर होती. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला.

परिणामी कंपन्यांना मागील वर्षीच्या तुलनेत किरकोळ किमतीत १५-२०% वाढ करावी लागली होती. परंतु एफएमसीजी क्षेत्रातील दोन सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कच्च्या आणि पाम तेलाच्या किमती गेल्या दोन महिन्यांत २५-५०% ने कमी झाल्या आहेत. त्याचा थेट परिणाम एफएमसीजीच्या विक्रीवर दिसून येत आहे. रिटेल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म बिजोमच्या ताज्या अहवालात म्हटले की, ‘वाईट काळ संपला आहे.’ गेल्या महिन्यात पर्सनल केअर आणि कमोडिटी उत्पादनांची मागणी सर्वाधिक वाढली. खाद्यतेलाच्या किमती १० ते १५ रुपयांनी कमी झाल्या आहेत.

कमोडिटीची विक्री अधिक 06% एफएमसीजी मार्केट ग्रोथ 17% खाद्यतेलाची कमोडिटी 14% पर्सनल केअर प्रॉडक्ट

पर्सनल केअर प्रॉडक्टची मागणी शाळा-महाविद्यालय, कार्यालय उघडल्यानंतर पर्सनल केअर प्रॉडक्टच्या विक्रीत वाढ झाली. एफएमसीजी क्षेत्रातील लोकांच्या मते, अलीकडच्या काळातील कमी विक्री येणाऱ्या महिन्यांत वेगवान वाढीसाठी आधार ठरेल. महागाई कमी झाल्यामुळे वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ग्रामीण वापरातही वाढ होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...