आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई:खाद्यपदार्थांच्या किमती घटल्या, घाऊक महागाई नीचांकी पातळीवर, गेल्या तीन महिन्यांपासून महागाई दर 15% वर राहिला

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुलैमध्ये घाऊक महागाई दर १३.९३% राहिला, जूनमध्ये १५.१८% होता

महागाईवर लगाम लावण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न काहीसे यशस्वी होताना दिसत आहेत. किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईही घटली आहे. मंगळवारी जारी केलेल्या सरकारी आकडेवारीनुसार जुलैमध्ये घाऊक महागाई दर १३.९३% राहिला. हा जूनमध्ये १५.१८% होता. दुसरीकडे, या वर्षी मेमध्ये हा १५.८८% च्या विक्रमी उंचीवर होता. गेल्या तीन महिन्यांपासून सलग घाऊक महागाई दर १५% वर राहिला. तो सलग १६ महिन्यांपासून दोन आकड्यात आहे. महागाई कमी होण्याचे मोठे कारण खाद्यसामग्री आणि मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनांच्या किमतीतील घट आहे. खाद्य महागाई जुलैमध्ये १०.७७% नोंदली, ही याआधी म्हणजे जूनमध्ये १४.३९% होती. मात्र, इंधन आणि विजेचा महागाई दर जूनच्या ४०.३८% वरून वाढून ४३.७५% राहिला. मॅन्युफॅक्चर उत्पादनांमध्ये महागाई ८.१६% आणि तेलबियांत -४.०६% राहिली.

अमूल, मदर डेअरीची २ रु./ लि. वाढ, आजपासून लागू
नवी दिल्ली - अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या किमती रु.प्रतिलिटरने वाढवल्या आहेत. नव्या किमती बुधवारपासून लागू होतील. गुजरात सह.दूध विपणन संस्थेनुसार, अमूलचे सर्व दूध ४% महागले आहे. यानंतर मदर डेअरीनेही किमतीत २ रु. लिटर वाढ केली. संस्थेनुसार, शेतकऱ्यांच्या देयकाच्या तुलनेत प्रतिलिटर २ रु. वाढ कमी आहे. दोन्ही कंपन्यांनी या वर्षी दुसऱ्यांदा दरवाढ केली आहे.

बातम्या आणखी आहेत...