आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दूरसंचार कंपनी:एजीआरसाठी व्होडाफोन-आयडियाला प्रति युजर कमवावे लागतील 85 रु. जास्त

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेवा महागडी केल्यास ग्राहक गमावण्याचा धोका राहील

कधीकाळी देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी राहिलेली व्होडाफोन-आयडियाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. नुकतेच एजीआर(एकीकृत समायोजित महसूल) थकबाकीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कंपनीला एजीआर चुकवावा लागेल हे निश्चित झाले. आता केवळ कालबद्धतेबाबत दिलासा मिळण्याची आशा आहे.

अशात तज्ञांनी आपल्या विश्लेषणात अंदाज व्यक्त केला की, कंपनीला हे कर्ज फेडण्यासाठी आपल्या प्रत्येक ग्राहकाकडून सरासरी महसूल म्हणजे एआरपीयूला ८५ रु. प्रतिमहिना वाढवावे लागेल. सध्या कंपनीचा महसूल ११७ रु. आहे. दुसरीकडे, भारती एअरटेलचा एआरपीयू १८१ आणि जिओचा एआरपीयू १४७ रु. आहे. दूरसंचार विभागानुसार, भारती एअरटेलवर ४४,००० कोटी तर व्होडाफोन-आयडियावर ५८,००० कोटी एजीआर थकीत होते. यापैकी एअरटेलने आतापर्यंत १८,००० कोटी, व्हाेडाफोन-आयडियाने ७,९०० कोटी रु. भरले आहेत. म्हणजे, दोन्ही कंपन्यांवर आता अनुक्रमे २६,००० कोटी आणि ५०,४०० कोटी थकीत आहेत.

ब्रोेकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या रिसर्च अॅनालिस्ट अलीअसगर शाकीर यांच्या एका विश्लेषणानुसार, सर्वोच्च न्यायालयाने एजीआर भरण्यासाठी २० वर्षांचा अवधी दिल्यास (सरकारने एवढा वेळ देण्याची मागणी केली) ८ टक्के व्याजदर लक्षात घेऊन भारती एअरटेलला दरवर्षी २,६०० कोटी रुपये आणि व्होडाफोन-आयडियाला कर वर्ष ५,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त जमा करावे लागेल. दुसरीकडे, सर्वाेच्च न्यायालयाने १५ वर्षांची सवलत देत ही रक्कम दोन्ही कंपन्यांसाठी वाढून अनुक्रमे ३,००० कोटी व ५,९०० कोटी होईल. १० वर्षांची सूट दिल्यास दोन्ही कंपन्यांना दरवर्षी अनुक्रमे ३,९०० कोटी आणि ७,५०० कोटी भरावे लागतील. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या विश्लेषणानुसार, २० वर्षांचा अवधी मिळाल्यास व्होडाफोन-आयडियाला दरवर्षी ५,२३५ कोटी रु., १५ वर्षांच्या अवधीत दरवर्षी ६,००५ कोटी रु. तर १० वर्षांच्या अवधीत दरवर्षी ७,६६० कोटी रु. जमा करावे लागतील.

अलीअसगर शाकीर यांनी आपल्या विश्लेषणात नमूद केले की, २० वर्षांच्या सवलतीच्या स्थितीत व्होडाफोन-आयडियाला पैसे भरण्यासाठी आपली ईबीआयटीडीए तिपटीने वाढवावी लागेल. असे करण्यासाठी कंपनीला प्रतिग्राहक सरासरी महसूल ११७ वरून वाढवून २०२ रु. करावा लागेल.

दोन वर्षांत कंपनीने गमावले १२ कोटींपेक्षा जास्त ग्राहक
२०१६ मध्ये व्होडाफोन देशाची क्रमांक दोन आणि आयडिया तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी होती. त्या वर्षी जिओने लाँच होण्यासोबत वेगात व्होडाफोन व आयडियाचे ग्राहक वळवायला सुरुवात केली. जिओचा आक्रमक पवित्रा पाहता व्होडाफोन आणि आयडियाने २०१८ मध्ये विलीनीकरण केले आणि विलीनीकरणानंतर अस्तित्वात आलेली कंपनी व्होडाफोन-आयडिया ४४.१६ कोटी ग्राहकांसोबत देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी झाली.मात्र, दोन वर्षांत कंपनीने १२ कोटींपेक्षा जास्त ग्राहक गमावले आहेत.