आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • For Non digital Business, Reliance Will Borrow Rs 11,300 Crore From Foreign Banks

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिलायन्स:बिगर डिजिटल बिझनेससाठी रिलायन्स विदेशी बँकांकडून 11,300 काेटींचे कर्ज घेणार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • 2021 पर्यंत कर्ज संपवण्याच्या योजनेवर काम करतेय कंपनी

रिलायन्स इंडस्ट्रीज परकीय कर्जाच्या माध्यमातून १५० काेटी डाॅलरची (११,३०० काेटी रु.) रक्कम उभारणार आहे. या रकमेचा उपयोग भांडवली खर्चासाठी करण्यात येणार असल्याचे या घडामाेडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच फेसबुक आणि इतर काही संस्थांनी कंपनीच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ६१,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज १०-१५ विदेशी कर्जदारांबराेबर चर्चा करत आहे. याची सिंडिकेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. कंपनी या कर्जाची परतफेड पाच वर्षांत करेल.  कर्जाची रक्कम कंपनीच्या डिजिटल व्यवसायाच्या व्यतिरिक्त विभागांच्या भांडवली खर्चासाठी उपयाेगात आणणार आहे. या व्यवसाय विभागांमध्ये  रिटेल, पेट्राे रसायने, तेल आणि वायू व्यवसाय समाविष्ट आहेत.कंपनीने काही आठवड्यांपूर्वी कर्जाच्या वाटाघाटी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. तेव्हापासून आतापर्यंत लक्ष्य ठेवण्यात आलेल्या कर्जाचा आकार ३० काेटी डाॅलरपर्यंत वाढला आहे.

६ महिन्यांच्या डॉलरवर आधारित लिबरमध्ये २.२५ ते २.५० टक्के समाविष्ट केल्यानंतर या कर्जाचा व्याजदर नक्की करण्यात येईल. कर्जाच्या हप्त्याच्या स्वरुपानुसार व्याजदराचा स्तर निश्चित हाेऊ शकेल, परंतु या संदर्भात रिलायन्सने भाष्य केलेले नाही.

३१ मार्चपर्यंत १.६१ लाख काेटी रु. कर्ज

या वर्षीच्या ३१ मार्च अखेर कंपनीवर १.६१ लाख काेटी रुपयांचे निव्वळ कर्ज हाेते. ३१ मार्च २०१९ राेजी ते १.५४ लाख काेटी रुपये हाेते. कंपनीने मार्च २०२१ पर्यंत पूर्ण कर्ज परतफेड करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मूल्यवर्धित पावले आणि हक्कभाग विक्रीमुळे कंपनीचा ताळेबंद भक्कम हाेऊ शकेल, असे कंपनीने या अगाेदर म्हटले हाेते. गुंतवणूकदारांच्या सादरीकरणात कंपनीने विद्यमान वर्षात कंपनीला १.०४ लाख काेटी रुपयांचे (१३.६ अब्ज डाॅलर) उत्पन्न हाेण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता.

बातम्या आणखी आहेत...