आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • For The First Time In The Stock Market, The Sensex Crossed The 65,000 Mark; Strong Rise In IRCTC Shares

शेअर बाजार 65 हजरांच्या पार:शेअर बाजारात पहिल्यांदाच सेन्सेक्सने ओलांडला 65 हजारांचा टप्पा; IRCTC च्या शेअरमध्ये जोरदार वाढ

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून उच्चांकावर असलेल्या शेअर बाजारात आज पुन्हा नवीन उच्चांक पाहायला मिळाला. IRCTC च्या शेअरमध्ये आज सकाळी 8 टक्क्यांनी वाढून 6,375 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये ही 52 व्या क्रमाकांची सर्वात मोठी कंपनी झाली आहे. बीएसईचा 30-स्टॉकचा निर्देशांक सेन्सेक्स 390.89 अंकांसह 62,156.48 वर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 18,602.35 च्या नवीन विक्रमासह व्यापार सुरु झाला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 289.17 अंकांच्या वाढीसह 62,054.76 वर होता, तर निफ्टी 80.55 अंकांच्या वाढीसह 18,557.60 वर होता.

आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये मजबूत तेजीचा कल आजदेखील कायम आहे. आज पुन्हा 8 टक्क्यांनी वाढून 6375 रुपयांवर पोहोचला आहे. एनएसइवर आज तो 6140.30 रुपयांवर उघडला आणि सकाळी 9.30 पर्यंत 6334 च्या पातळीला स्पर्श केला. एलअँडटी, विप्रो, भारती एअरटेल, टेक महिंद्रा आणि बजाज फिनसर्व सुरुवातीच्या व्यापारात निफ्टीच्या सर्वाधिक लाभधारकांच्या यादीत होते. आयटीसी, एस्कॉर्ट्स मोटर्स, अल्ट्राटेक, आयओसी आणि टाइट सारखे स्टॉकमध्ये कोणतीही वाढ दिसून आली नाही.

एका वर्षात 100 वरून 500 रुपये

IRCTC च्या शेअरमध्ये एका वर्षात कमालीचा उच्चांक पाहायला मिळाला. एका वर्षा पुर्वी 1291 रुपयांवर असणार शेअर आणि 6300 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एका महिन्यापुर्वी याचे दर 3550 रुपये इतके होते. त्यावेळी कंपनी 92 व्या क्रमांकावर होती. त्यावेळी देखील याची किंमत 1500 रुपयांनी वाढली होती.

बातम्या आणखी आहेत...