आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एनर्जी:सलग दहाव्या दिवशी तेल कंपन्यांनी सामान्यांना दिला धक्का, पेट्रोल-डिजेलसोबत विमान इंधन महागले

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 दिवसांत 5.47 रुपयांनी महागले पेट्रोल

शासकिय तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवून सर्व सामान्यांना धक्का दिला आहे. मंगळवारी कंपन्यांनी सलग दहाव्या दिवशी त्यांचे दर वाढवले. देशातील सर्वात मोठी तेल विपणन कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत आज 47 पैशांनी वाढून 76.73 रुपये प्रति लीटर झाली आहे. 17 नोव्हेंबर 2018 नंतरची ही सर्वोच्च वाढ आहे. डिझेलची किंमतही 57 पैशांनी वाढून 75.19 रुपये प्रति लीटर झाली आहे. 21 ऑक्टोबर 2018 पासूनची हा सर्वोच्च दर वाढ आहे.

10 दिवसांत 5.47 रुपयांनी महागले पेट्रोल
7 जूनपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज वाढ होत आहे. या दहा दिवसांत दिल्लीत पेट्रोल 5.47 रुपयांनी म्हणजे 7.68 टक्के आणि आणि डिझेल 5.80 रुपये म्हणजेच 8.34 टक्क्यांनी महाग झाले आहे. कोलकाता आणि मुंबईमध्ये पेट्रोलचा दर अनुक्रमे 45-45 पैशांनी वाढून 78.55 आणि 83.62 रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये हे 41 पैशांनी वाढून 80.37 रुपये प्रति लीटर झाले. तर कोलकातामध्ये डिझेल 51 पैशांनी वाढून 70.84 रुपये, मुंबईत 54 पैसे महाग होऊन 73.75 रुपये आणि चेन्नईत 48 पैशांनी वाढून 73.17 रुपये प्रति लीटर पोहोचला आहे.

देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिजेलची किंमत

महानगरपेट्रोलडिजेल
दिल्ली76.7375.19
कोलकाता78.5570.84
मुंबई83.6273.75
चेन्नई80.3773.17

विमान इंधन 17 टक्के महाग झाले 
विमान इंधनाच्या किंमती सोळा दिवसात दुसऱ्यांदा वाढल्या आहेत. देशाच्या विविध शहरांमध्ये मंगळावारी याची किंमत 14 ते 17 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी तेल विपणन कंपनी इंडियन ऑइलनुसार राजधानी दिल्लीमध्ये विमान इंधनाची किंमत  5,494.50 रुपये म्हणजेच 16.36 टक्क्यांनी वाढून 39,069.87 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. यापूर्वी याची किंमत 33,575.37 रुपये प्रति किलोलीटर होती. या महिन्यात दोन वेळा दिल्लीमध्ये विमान इंधन 82 टक्क्यांनी महाग झाले आहे. पहिले एक जूनपासून किंमतींमध्ये 56 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चापैकी 35 ते 40 टक्के खर्च इंधनावर होतो. इंधनाचे दर वाढल्याने त्यांच्या अडचणी वाढू शकतात.

देशाच्या चार महानगरांमध्ये विमान  इंधनची किंमत

महानगरपहलेअब
दिल्ली33575.3739069.87
कोलकाता38543.4844024.10
मुंबई33070.5638565.06
चेन्नई34569.3040239.63

नोट: किंमत रुपये प्रतिलीटरमध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...