आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाइट कॉलर इकॉनॉमीमध्ये वाढतेय महिलांची मागणी:महिलांसाठी  फेब्रुवारीमध्ये  35 टक्के नोकऱ्या वाढल्या

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या व्हाइट कॉलर इकॉनॉमीमध्ये महिला कर्मचाऱ्यांची मागणी वाढत चालली आहे. फेब्रुवारीमध्ये महिलांसाठी उपलब्ध नोकऱ्या ३५% वाढल्या आहेत. व्हाइट कॉलर कर्मचारी कार्यालयात बसून कारकुनी, प्रशासकीय आणि व्यवस्थापन स्तरावरील कामे करतात. एम्प्लॉयमेंट वेबसाइट फाउंडइटच्या ऑनलाइन हायरिंग ट्रेंड्सच्या मते, आयटी आणि बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट क्षेत्रात महिलांसाठी उपलब्ध नोकऱ्या सर्वात जास्त ३६% वाढल्या. याचे मुख्य कारण म्हणजे या क्षेत्रातील कंपन्यांकडून कामाच्या ठिकाणी लैंगिक समानतेवर वाढता भर. पूर्वी फाउंडाइट मॉन्स्टर एपीएसी आणि एमई म्हणून ओळखले जात होते. दिल्ली-एनसीआर सर्वात पुढे : मोठ्या शहरात महिलांसाठी उपलब्ध नोकऱ्या सर्वात दिल्ली एनसीआर (२१%), मुंबई (१५%), बंगळुरू (१०%), चेन्नई (९%) आणि पुणे (७%)मध्ये उपलब्ध आहेत.

आयटीत महिलांसाठी सर्वाधिक जागा
{आयटी/कम्प्युटर्स-सॉफ्टवेअर सेक्टर 35%
{बँकिंग, अकाउंटिंग, आर्थिक सेवा 22%
{स्टाफिंग, एचआर 20%
{हॉस्पिटल, हेल्थकेअर आणि डायग्नोस्टिक्स 8%
{एका वर्षात कमी अनुभवाच्या नोकरी 5% वाढली

३-५ वर्षे अनुभव असणाऱ्या प्रोफेशनल्सची मागणी जास्त
अनुभव फेब्रुवारी 22 फेब्रुवारी 23
१ वर्ष कमीत कमी 6% 11%
1-3 वर्षे 15% 18%
3-5 वर्षे 23% 24%
5-7 वर्षे 15% 12%
7-10 वर्षे 18% 12%
10-15 वर्षे 17% 15%
15 वर्षांपेक्षा अधिक 6% 8%

बातम्या आणखी आहेत...