आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Foreigners Were Already Sellers, Now The Investment Of Domestic Investors Has Also Declined; Nifty Could Fall To 15,500

गुंतवणूकही घटली:परदेशी आधीच विक्रेते होते, आता देशी गुंतवणूकदारांची गुंतवणूकही घटली; निफ्टी 15,500 पर्यंत घसरू शकतो

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील शेअर बाजारात काही महिन्यांपासून सुरू असलेली अस्थिरता आता पडझडीत बदलली आहे. गेल्या ८ महिन्यांपासून परदेशी गुंतवणूकदार विक्री करत होते, आता देशी गुंतवणूकदारांनीही विक्री सुरू केली आहे. तज्ज्ञांच्या मते, घसरण सुरूच राहील आणि वाईट परिस्थितीत निफ्टी १५,००० चा स्तर गाठू शकतो. तथापि १५,५०० वरदेखील समर्थन अपेक्षित आहे. तज्ज्ञांच्या मते, शेअर बाजाराला सर्वात जास्त घाबरणारी गोष्ट म्हणजे अनिश्चितता. सध्या एक-दोन नव्हे, तर पाच गोष्टींबाबत अनिश्चिततेची स्थिती आहे. क्रूड कुठे जाईल?, रुशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम काय होईल? रुपया किती कमजोर होईल? महागाईतून दिलासा कधी मिळणार? व्याजदर आणखी किती वाढणार? याबाबत स्पष्टता नसेल तर बाजार कमजोर राहील.

निफ्टी आता कोविडपूर्वच्या कमालपासून २७% वर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निफ्टी कोविडच्या आधीच्या उच्चांकापेक्षा दीड पटीने जास्त होता. आता सुधारणेमुळे ही तफावत फक्त २७% वर आली आहे.

मोठी खरेदी टाळा, फक्त चांगल्या कंपन्यांत गुंतवणूक करा
-बाजार का घसरत आहे?

गेल्या ८ महिन्यांपासून परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सतत पैसे काढून घेत होते, परंतु देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याने बाजार रोखून धरला होता. आता देशांतर्गत गुंतवणूकदारांनी गुंतवणूक कमी करण्यास सुरुवात केली आहे. किरकोळ गुंतवणूकदारही घाबरून विक्री करत आहेत. त्यामुळे घसरण होत आहे.

- गुंतवणूकदार पैसे का काढत आहेत?
जगभरात तरलता कमी होत आहे, त्यामुळे इक्विटीमधूनही पैसा बाहेर पडत आहे. महागाईमुळे कंपन्यांचे मार्जिन घसरणे अपेक्षित आहे आणि अर्थव्यवस्थेतील मागणी कमी होईल. असे झाल्यास आर्थिक विकासावर परिणाम होईल, त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर होईल.

-बाजाराची स्थिती कधी सुधारेल?
अल्पावधीत विक्री वाढेल. सर्वात वाईट परिस्थितीत, निफ्टी १५,००० च्या पातळीपर्यंत घसरू शकतो. तांत्रिक आलेखातही निफ्टीचा अल्पकालीन कल नकारात्मक आहे. १५६७० पर्यंत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. निफ्टीला १५,५०० वर समर्थन मिळण्याची अपेक्षा आहे. येथे रिव्हर्सल पॅटर्नची पुष्टी केल्याने बाजारात तेजी येऊ शकते.

-किरकोळ गुंतवणूकदारांनी काय करावे?
सामान्य गुंतवणूकदारांसाठी ही नक्कीच एक संधी आहे, परंतु त्यांनी एकाच वेळी मोठी खरेदी करणे टाळावे. विश्वासार्ह व्यवसाय असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये हळूहळू पैसे गुंतवणे हे चांगले धाेरण ठरेल. बाजार स्थिरतेकडे परत आला तरी, सर्व शेअर्स पूर्वीप्रमाणे वाढतील असे नाही. व्यवसाय वाढण्याची ठोस कारणे स्पष्टपणे दिसतील असेच शेअर्स आता चालतील.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निफ्टी कोविडच्या आधीच्या उच्चांकापेक्षा दीड पटीने जास्त होता. आता सुधारणेमुळे ही तफावत फक्त २७% वर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...