आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Former ICICI Bank MD Chanda Kochhar's Husband Arrested By ED For Lending Rs 3,250 Crore To Videocon Company

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ICICI बँक-व्हिडिओकॉन प्रकरण:माजी एमडी चंदा कोचर यांच्या पतीस ईडीने केली अटक, व्हिडिओकॉनला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे प्रकरण

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्जवाटपात झालेला अपहार व मनी लाँडरिंग प्रकरणात चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि इतरांविरुद्ध चौकशी सुरू आहे

आयसीआयसीआय-व्हिडिओकॉनप्रकरणी बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना सोमवारी ईडीने अटक केली. व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांना आयसीआयसीआय बँकेकडून ३२५० काेटींचे कर्ज मिळवून देण्यात घोटाळा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

कर्जवाटपात झालेला अपहार व मनी लाँडरिंग प्रकरणात चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि इतरांविरुद्ध ईडीची चौकशी सुरू आहे. बँकेची कर्जदार कंपनी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजकडून चंदा यांच्या पतीच्या कंपनीतील गुंतवणुकीत घोटाळ्याच्या आरोपानंतर चंदा कोचर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये राजीनामा दिला होता. या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच धूत यांच्यासह चंदा कोचर आणि त्यांच्या पतीविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. चंदा कोचर यांच्या दिराचीही चौकशी करण्यात आली होती.

ईडीने चंदा कोचर यांचा फ्लॅट आणि पती दीपक कोचर यांच्या कंपनीतील काही मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. जप्त मालमत्तांचे मूल्य ७८ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser