आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. इम्रान यांच्या मते, भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, ते कोणाच्याही दबावापुढे झुकत नाही. जगात इंधन महाग होत आहे, असे असतानाही भारत सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. भारत हा क्वाडचा सदस्य आहे आणि तरीही तो रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करत आहे.
इम्रान यांनी मोदी सरकारच्या निर्णयांचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सत्तेत आल्यापासून इम्रान यांनी अनेक सभांमध्ये भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे. भारत भलेही आपला शत्रू देश असेल, पण आपण त्याच्या चांगल्या धोरणांपासून शिकले पाहिजे, असेही खान यांनी म्हटले आहे.
खान काय म्हणाले
केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 6 रुपयांनी कपात केली. त्यामुळे पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
यानंतर इम्रान खान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यामध्ये ते म्हणाले की, भारत क्वाडचा सदस्य आहे. त्याच्यावर अमेरिकेचा दबाव आहे. असे असतानाही ते रशियाकडून स्वस्त तेल विकत घेत आहे आणि या माध्यमातून आपल्या नागरिकांना दिलासा देत आहे. माझ्या सरकारलाही भारताच्या धर्तीवर स्वतंत्र परराष्ट्र धोरण हवे होते आणि त्यासाठी ते काम करत होते. आज जे सरकार आहे ते खोटे दावे करत फिरत आहे. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे.
पाकिस्तान महत्त्वाचा
खान पुढे म्हणाले- माझ्या सरकारसाठी पाकिस्तानचे हित सर्वात महत्त्वाचे होते, पण परकीय शक्तींसोबत गद्दारांनी माझे सरकार पाडले. आता ते पुन्हा पुन्हा इकडून तिकडे मागत फिरत आहेत.
वास्तविक सत्ता गेल्यानंतर खान यांनी असे विचार व्यक्त केले आहे. याआधी ते भारत आणि पंतप्रधान मोदींबद्दल वाइटच गोष्टी बोलत राहिले. खान यांना सत्ता जाणार आहे असे वाटल्यावर त्यांनी आयएमएफच्या अटी झुगारून पेट्रोलवर 10 रुपये आणि डिझेलवर 5 रुपये दिलासा दिला होता. त्यामुळे कर्जाचा बोजा आणखी वाढला. आता शाहबाज शरीफ निवडणुकीपूर्वी इंधन महाग करण्याचे टाळत आहेत. दुसरीकडे, मदत देण्यापूर्वी IMF पेट्रोल आणि डिझेल 30 रुपयांनी महाग करण्याचा आग्रह धरत आहे. वीज 10 रुपयांनी प्रति युनिट महाग करण्याचाही दबाव आहे.
मरियम नवाज यांचे उत्तर
इम्रान यांनी भारताचे कौतुक केले, तर सत्ताधारी आघाडीच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या मरियम यांनी खान यांची खरडपट्टी काढली आहे. मरियम म्हणाल्या की, खान साहेब आजकाल भारताची स्तुती करताना थकत नाही. मी त्यांना एवढेच सांगेन की जर त्यांना भारत इतकाच आवडत असेल तर त्यांनी तिथेच जावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.