आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया वर्षी शेअर बाजारात नोंदणीकृत भारतीय आयुर्विमा महामंडळ(एलआयसी) फॉर्च्युन ग्लोबल ५०० च्या ताज्या यादीत ९८ व्या स्थानावर आहे. २०२२ च्या या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज ५१ स्थानांची झेप घेत १०४ वर पोहोचली आहे. एलआयसी ९७.२६ अब्ज डॉलर(७.७१ लाख कोटी रु.) महसूल आणि ५५.३८ कोटी डॉलर(४.३९ लाख कोटी रु.) लाभासह देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.
बाजार भांडवलाबाबत भारताची सर्वात मूल्यवान कंपनी मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लि. आहे. रिलायन्स ९३.९८ अब्ज डॉलर(७.४५ लाख कोटी रु.) महसूल व ८.१५ अब्ज डॉलर(६४,६४५.८ कोटी रु.) निव्वळ नफ्यासह १९ वर्षांपासून या यादीत आहे. यादीत टॉपवर अमेरिकी कंपनी वॉलमार्ट आहे. भारताच्या कंपन्यांत ५ सरकारी आहेत. एलआयसीच रिलायन्सच्या वर आहे. यादीत ३१ मार्च २०२२ वा त्याआधी संपलेल्या वित्त वर्षासाठी महसुलाच्या आधारावर कंपन्यांना स्थान दिले जाते. चीनची ऊर्जा कंपनी स्टेट ग्रीड, चायना नॅशनल पेट्रोलियम आणि सिनोपेक टॉप पाचमध्ये आहेत. प्रथमच ग्रेटर चीनच्या(तैवानसह) कंपन्यांचा महसूल अमेरिकी कंपन्यांच्या महसुलापेक्षा जास्त आहे.
भारताच्या ९ कंपन्या
कंपनी स्थान झेप
एलआयसी 98 प्रथमच
िरलायन्स 104 51
आयओसी 142 28
ओएनजीसी 190 16
एसबीआय 236 17
बीपीसीएल 295 19
टाटा मोटर्स 370 00
टाटा स्टील 435 00
राजेश एक्स्पोर्ट्स 437 00
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.