आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Founder Of Infosys Narayana Murthy | Marathi News | Interview Of Narayana Murthy

इंटरव्ह्यू:स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीपूर्वी आयडिया सोप्या शब्दांत सांगणे शक्य आहे का, हे आधी पाहतो

बंगळुरू / स्कंद विवेक धरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी उलगडली गुंतवणुकीमागची निर्णयप्रक्रिया

४० वर्षांपूर्वी आयटी कंपनी इन्फोसिसची स्थापना करणारे एनआर नारायण मूर्ती आता उद्योजक घडवण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. साधेपणा, दूरदृष्टी आणि उच्च नैतिक मूल्यांचे पालन करणाऱ्या नारायण मूर्ती यांच्याशी चर्चा करून ‘दैनिक भास्कर’ने देशातील विद्यमान ‘स्टार्टअप इकोसिस्टिम’शी संबंधित गोष्टी जाणून घेतल्या. गुंतवणूक करण्यापूर्वी ते कोणत्याही कल्पनेचे मूल्यमापन कसे करतात, कोणते निकष लावतात याविषयी त्यांच्याशी केलेली ही बातचीत.

आंत्रप्रेन्योरशिपबाबत...
चांगल्या वेतनाच्या नोकऱ्याच भारतातील गरिबी दूर करतील. आंत्रप्रेन्योर (उद्योजक) नोकऱ्या देतील.
नोकरी देणे ही सरकारची जबाबदारी नाही. रोजगारवृद्धी होईल असे वातावरण तयार करणे ही सरकारची जबाबदारी आहे. वर्षाला ५० कोटी रुपये नफा मिळवत नाही तोपर्यंत कोणत्याही उद्योगात शासकीय यंत्रणेने ढवळाढवळ करू नये, असे माझे ठाम मत आहे.

विद्यमान संधी…
सर्वच क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध आहेत. शिक्षण, आरोग्य, कृषी, उत्पादन, रिटेल, ‌िवमा, हाउसिंग, पर्यटन, आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) अगदी सकस आहारापर्यंत आपण फक्त नाव घ्या प्रत्येक क्षेत्रात अमाप संधी उपलब्ध आहेत. मनुष्यबळाचा योग्य वापर करून उद्योग-व्यापारामध्ये उत्पादकता वाढवणे हे क्षेत्र स्टार्टअपसाठी सध्या चांगले आहे. त्यावर काही उद्योजक कामही करीत आहेत.

आर्थिक विकास …
उदार भांडवलशाहीचा मी समर्थक आहे. त्यावर माझा विश्वास आहे. भांडवलशाहीचा कोणत्या न कोणत्या स्वरूपात अंगीकार केल्याविनाच गरिबी हटवली असा एकही देश मी अद्याप पाहिलेला नाही. अमेरिकेने समताेल भांडवलशाही, तर चीनने सरकार नियंत्रित भांडवलशाही स्वीकारली. सिंगापूरचेही मोठे उदाहरण आहे. उदार भांडवलशाही म्हणजे डोक्यात भांडवलशाही परंतु मन उदार हवे. याचा सरळ अर्थ असा की सर्वात कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या गरजा भागतील एवढे वेतन दिल्याची खात्री झाल्यानंतरच कंपनीचे नेतृत्व करणाऱ्यांनी आपला वाटा घ्यावा. कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित इन्सेटिव्ह मिळाला पाहिजे. केवळ उदार भांडवलशाहीमुळेच भारतातील गरिबी हटू शकेल, असा मला विश्वास आहे.

स्टार्टअपमधील गुंतवणूक..
आम्ही आयडियाचे ५ निकषांवर परीक्षण करतो.

1. आयडिया सोप्या शब्दात एका वाक्यात सांगता येते का ? तसे सांगता येत असेल तरच ग्राहक, टीम आणि गंुतवणूकदार ते सहज समजू शकतील.
2. बाजारात आधीच असलेल्या इतर उद्योगांपेक्षा कितपत वेगळा आणि सरस आहे ?
3. बाजारात याची चाचपणी केली आहे का ? केली असल्यास ती कितपत यशस्वी ठरली ?
4. आपल्या संकल्पनेचे मूल्य कितपत आहे हे उद्योजकाला समजले आहे का ?
5. या संकल्पनेवर काम करण्यासाठी सक्षम, शिस्तबद्ध प्रामाणिक, मेहनती टीम त्यांच्याकडे आहे का ?

बातम्या आणखी आहेत...