आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरदारांसाठी महत्वाची बातमी:आठवड्यात चार दिवस काम-तीन दिवस सुट्टी, लवकरच नवीन नियम आणण्याच्या तयारीत सरकार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन लेबर कोडमध्ये या नवीन नियमाला सामील केले जाऊ शकते
  • आयटी आणि शेयर्ड सर्व्हिसेजसारख्या सेक्टर्सला मिळेल जास्त फायदा

नोकरदार वर्गासाठी केंद्र सरकार लवकरच आनंदाची बातमीदेणार आहे. सरकार लवकरच चार दिवसांचा आठवडा करण्याच्या तयारीत आहे. परंतु, साठी उर्वरित दिवशी मोठ्या शिफ्टमध्ये काम करावे लागेल.

आठवड्यात 48 तास काम करावे लागेल

लेबर सेक्रेटरी अपूर्वा चंद्रा यांनी सांगितल्यानुसार, आठवड्यात 48 तास काम करण्याचा नियम कायम असेल. पण, कंपन्यांना तीन शिफ्टमध्ये काम करण्यास मंजुरी दिली जाऊ शकते. चंद्रा यांनी पुढे सांगितले की, 12 तासंची शिफ्ट करणाऱ्या कर्मचाऱ्याला 4 दिवस काम करावे लागेल. याप्रकारे 10 तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला 5 दिवस आणि 8 तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला 6 दिवस काम करावे लागेल.

तीन शिफ्टबाबत कोणताही दबाव नाही

चंद्रा म्हणाल्या की, आम्ही तीन शिफ्टबाबात कर्मचारी किंवा कंपन्यांवर कोणताच दबाव टाकणार नाही. यात थोडी लवचिकता दिली जाईल. चंद्रा म्हणाल्या की, बदलत्या कामाच्या पद्धतीमुळे हे बदल करण्याच्या तयारीत आहेत. ही तरतूद लेबर कोडचा भाग असेल. नियम लागू झाल्यानंतर कंपन्यांना चार किंवा पाच दिवसांच्या वर्क कल्चरसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल.

नवीन आठवडा सुरू होण्यापूर्वी सुट्टी द्यावी लागेल

चंद्रा पुढे म्हणाल्या की, कंपन्यांना नवीन आठवडा सुरू करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी लागेल. कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा दिला, तर तीन दिवस सुट्टी द्यावी लागेल. पाच दिवस काम करुन घेतल्यास दोन दिवस सुट्टी द्यावी लागेल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता, याच महिन्यात होऊ शकते घोषणा

केंद्र सरकारच्या सध्याच्या 50 लाख कर्मचारी आणि 61 लाख पेंशनधारकांसाठी एक खुशखबर आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची घोषणा लवकरच होऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार याच महिन्यात केंद्र सरकार डियरनेस अलाउंस (DA)मध्ये 4% वाढ करू शकते.यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कमालीची वाढ होईल. परंतु, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जुलै, 2020 पासून 1 जानेवारी 2021 पर्यंतचा DA मिळणार नाही. केंद्र सरकारने कोराना महामारीमुळे एप्रिलमध्ये महागाई भत्त्यावर बंदी घातली होती.

बातम्या आणखी आहेत...