आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Free Silai Machine Yojana Maharashtra, How To Apply Online And Offline | Latest And Update News 

महिलांना रोजगाराची संधी:महाराष्ट्र सरकारकडून मिळते 'फ्री शिलाई मशीन'; जाणून घ्या- या योजनेचा लाभ कसा मिळवायचा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काय आहे फ्री शिलाई मशीन योजना
देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे हे सरकारच्या फ्री सिलाई मशीन योजनेचे 2023 चे उद्दिष्ट आहे. महिलांना घरबसल्या शिवणकाम करून चांगले पैसे मिळावेत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा, यासाठी केंद्रसरकारच्या वतीने प्रत्येक राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे.
या फ्री शिलाई मशीन योजनेच्या 2023 च्या माध्यमातून कामगार महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवले जाईल, तसेच या सिलाई मशीन योजनेमुळे ग्रामीण महिलांची आर्थिक स्थितीही सुधारेल. चला तर आज जाणून घेऊया, या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळतो, त्यासाठी कुठे अर्ज करायचा, पात्रता काय लागते.

PM फ्री सिलाई मशीन योजनेतील राज्यांची माहिती
सध्या ही योजना सरकारकडून राज्य स्तरावर सुरू केली जात आहे, त्यामुळे देशातील सर्व राज्यांमध्ये ही योजना अद्याप लागू झालेली नाही, परंतु सरकार लवकरच संपूर्ण देशात हि योजना लागू करणार आहे, अशा राज्यांची यादी येथे आहे. ही मोफत शिलाई मशीन योजना लागू आहे. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन देण्यात येते. मोफत शिलाई मशीन मिळाल्याने महिला घरबसल्या शिवणकाम करून उत्पन्न मिळवू शकतात. देशाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचा या योजनेत समावेश केला जाईल.

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन 2023 अंतर्गत, केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील 50,000 हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन पुरवणार आहे. महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवणे. राज्यातील महिलांच्या सशक्तीकरणाला सुद्धा बळकटी देता येणार आहे. महिलांना एक नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी घेता येईल.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थीच्या उत्पन्नाचा पुरावा (वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे)
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जन्म प्रमाणपत्र (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचे प्रमाणपत्र)
  • मोबाईल नंबर
  • अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार अपंग महिला असल्यास, तिच्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे
  • शिधापत्रिका
  • जातीचा दाखला
  • शिवणकामाचे यंत्र चालवण्याचे प्रमाणपत्र

आता जाणून घ्या- अर्ज करण्याची प्रक्रिया
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराने सर्वप्रथम त्यांच्या क्षेत्रातील नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयातील महिला व बालकल्याण विकास विभागाकडे जाऊन या योजनेसाठी अर्ज करावा.
याव्यतिरिक्त तुम्ही ऑनलाइन जाऊन या योजनेच्या संबंधित अर्ज डाऊनलोड करू शकता.
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक आणि योग्य भरून अर्जाला आवश्यक असलेली सर्व संबंधित कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून योजनेचा अर्ज सबमिट करा आणि अर्जाची पोचपावती मिळवा.
यानंतर तुमचा अर्जाची पडताळणी होईल. तुम्हाला सूचित केले जाईल.
शेवटी तुम्हाला शिलाई मशीन मोफत वाटप केले जाईल.

या कारणांमुळे तुमचा अर्ज होईल बाद
अर्जात चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाईल.
अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी नसल्यास अर्ज नाकारला जाईल.
अर्जात अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजनेंतर्गत शिलाई मशीनचा लाभ घेतला असेल तर या अर्ज रद्द केला जाईल.
महिला अर्जदार गरीब कुटुंबातील नसल्यास आणि कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्यास अर्ज रद्द होईल.
महिला अर्जदाराकडे शिलाई मशीन चालविण्याचे प्रमाणपत्र नसल्यास अर्ज रद्द केला जातो.

महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना अटी -
शिलाई मशीन योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच दिला जातो.
महाराष्ट्र राज्याबाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला लाभार्थीचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असावे.
40 वर्षांवरील महिला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत
1.2 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
महिला अर्जदारांकडे शिलाई मशीन शिकल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/गरीब वर्गातील महिलाच घेऊ शकतात.
विधवा महिला आणि दिव्यांग महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल.
अर्जदार विधवा असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.
अर्जदार दिव्यांग महिला असल्यास अर्जासोबत तसे प्रमाणपत्र जोडावे.

फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र एका दृष्टीक्षेपात
कोणी सुरूवात केली - पंतप्रधान नरेंद्र मोदी
योजना कधीपासून प्रारंभ - 2019
लाभार्थी - देशातील व महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी महिला
अधिकृत वेबसाईट - www.india.gov.in/
उद्देश्य - आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे.
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाइन / ऑफलाईन
लाभ- गरीब ग्रामीण किंवा शहरी महिलांना मोफत सिलाई मशीन

बातम्या आणखी आहेत...