आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइलेक्ट्रिक उत्पादनांत प्रामुख्याने वापर होणाऱ्या तांब्याच्या किमती बुधवारी एमसीएक्सवर आतापर्यंतच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत. उन्हाळा सुरू होण्यआधी तांब्याच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम फ्रिज, एसी, कूलर आणि पंख्यांसह विविध इलेक्ट्रिक उत्पादनांच्या किमतीवर पडण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात विकणाऱ्या बहुतांश इलेक्ट्रिक उपकरणांची निर्मिती जानेवारीपासून मार्चदरम्यान होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर बुधवारी तांब्याची किंमत ६३८.५० प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. या धातूची ही अातापर्यंतची सर्वात जास्त किंमत आहे. वर्षभरापूर्वी याच अवधीत तांब्याची किंमत ४२० रु. प्रति किलो होती. म्हणजे, वर्षभरात किंमत ५० टक्के वाढली आहे. लंडन मेटल एक्सचेंजवर तांबे २०१२ नंतर सर्वात उच्च पातळी ८३०२ डॉलर प्रति टनावर पोहाेचले आहे. एसी आणि फ्रिज दोन्हींत तांब्याच्या ट्यूबचा वापर होतो. या ट्यूबच्या माध्यमातून रेफ्रिजरेंट प्रवाहित होतो. याच पद्धतीने पंख्याच्या कॉइलमध्ये तांबे वापरले जाते. कूलरचे पंखे अणि हनीकाेम्ब नेटमध्येही तांब्याचा वापर होतो. याशिवाय विजेच्या तारांमध्येही तांब्याचा वापर होतो. एंजेल ब्रोकिंगचे एव्हीपी रिसर्च अनुज गुप्ता म्हणाले, उन्हाळ्यातील उपकरणे उदा. फ्रिज, एसी, कूलर, पंखे आदी हिवाळ्यात तयार होतात. तांब्याच्या वाढत्या किमतीचा परिणाम उपकरणांच्या किमतीवरही पाडेल. आगामी काळात तांब्याच्या किमती ७०० ते ७५० रु.च्या पातळीवर पोहोचेल.
या पाच कारणांमुळे वाढली किंमत
उद्योग एसी आणि रेफ्रिजरेटरच्या निर्मितीसाठी तांब्याचा उपयोग करतात आणि त्यामुळे तांब्याच्या किमतीतील वाढीमुळे निश्चितपणे या वस्तूंवर परिणाम होईल. आम्ही या परिणामाचे आकलन करत आहोत. - कमल नंदी, ईव्हीपी, गोदरेज होम अॅप्लायन्स
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.