आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • From 20 April You Buy Online Fridge, TV, Cooler, Laptop, Mobile; Another Discount In The Green Zone In Lock Down 2

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा:20 पासून फ्रिज, टीव्ही, कूलर, लॅपटॉप, मोबाइलची ऑनलाइन खरेदी शक्य; ग्रीन झोनना लॉकडाऊन-2 मध्ये आणखी एक सूट

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ई-कॉमर्स कंपन्यांसाठी दिलेल्या सूटबद्दल गृह मंत्रालयाचे स्पष्टीकरण

कोरोनाचा संसर्ग नसलेल्या भागात २० एप्रिलपासून बाजारपेठा सुरू करण्याबाबत गुरुवारी गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार सोमवारपासून अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या ई कॉमर्स कंपन्या मोबाइल तसेच फ्रिज, टीव्ही, लॅपटॉप, एसी, कुलर इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू, तयार कपडे आणि शाळकरी मुलांसाठी स्टेशनरी विकू शकतील. स्थानिक बाजारपेठांत मात्र या वस्तूंची दुकाने उघडणार नाहीत. केेंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी बुधवारी ३ मे पर्यंत लॉकडाऊन कालावधीबाबत सुधारीत निर्देश जाहीर केल्याच्या दुसऱ्या दिवशी हा निर्णय झाला. या निर्देशांमध्ये ई-कॉमर्स कंपन्या आणि कुरिअर कंपन्यांना २० एप्रिलपासून काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. ताज्या खुलाशात म्हटले आहे की, ई कॉमर्स कंपन्यांची वाहने संबंधित प्राधिकरणाच्या परवानगी नंतरच ये- जा करू शकतील. ही सूट केवळ कोरोनाचा हॉटस्पॉट नसलेल्या भागातच देण्यात येईल.

विमान कंपन्यांना निर्देश : प्रवाशांना बुकिंगचे पैसे परत द्या

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १५ एप्रिल ते ३ मे या कालावधीत प्रवासासाठी बुक तिकिटाबाबत विमान कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, प्रवाशांना ३ हप्त्यात कोणतेही शुल्क न कापता पूर्ण पैसे परत द्या. लॉकडाऊनमुळे उड्डाण रद्द झाल्याने हे सर्व पैसे परत द्यावे लागतील.

आरोग्य, मोटार विम्याचा प्रिमियम १५ मेपर्यंत भरा

वाहनांचा थर्ड पार्टी विमा आणि आरोग्य विमा पॉलिसीचा प्रिमियम भरण्याची तारीख १५ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. २५ मार्चपासून ३ मेपर्यंत देय प्रिमियम आता १५ मेपर्यंत भरता येईल. सरकारने यापूर्वी २१ एप्रिलपर्यंत ही मुभा दिली होती. 

एसबीआयचा अहवाल : लॉकडाऊनमुळे देशाचे १२.१ लाख कोटींचे नुकसान

मुंबई : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या ४० दिवसांच्या लाॅकडाऊनमुळे देशाचे १२.१ लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती स्टेट बँकेने व्यक्त केली आहे. हा तोटा जीडीपीच्या स्थूल मूल्याच्या ६% आहे. बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात नाममात्र विकास दर ४.२%च्या आसपास राहू शकतो, तर वास्तविक जीडीपी १.१% राहील. आधी २.६% अंदाज वर्तवण्यात आला होता. एसबीआय समूहाचे प्रमुख आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी तयार केेलेल्या या अहवालात म्हटले आहे की, कोरोनामुळे गेल्या आर्थिक वर्षात (२०१९-२०) अनेक संस्थांनी विकास दराचा अंदाज ५ टक्के वर्तवला होता. तो आता कमी होत ४.१ टक्के राहू शकतो. लॉकडाऊनमुळे सुमारे ३७.३ कोटी मजुरांचे रोज १० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. या हिशेबाने लॉकडाऊन काळात हे नुकसान ४.०५ लाख कोटी रुपये होण्याची भीती आहे. 

बातम्या आणखी आहेत...