आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • From September 1, There Will Be Changes In These 5 Rules Including EPF Account And Banking, It Will Also Affect You; News And Live Updates

कामाची गोष्ट:1 सप्टेंबरपासून EPF खाते आणि बँकिंगसह या 5 नियमांमध्ये होणार बदल, तुमच्यावरही होईल याचा परिणाम

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • EPF खाते आधारशी लिंक करणे आवश्यक

देशात 1 सप्टेंबरपासून अनेक बदल होणार आहेत. ईपीएफ खाते आणि बँकिंगसह 5 नियमांमध्ये मोठे बदल होत आहे. या नियमांनुसार, जर पंजाब नॅशनल बँकेत तुमचे खाते असेल तर तुमच्या बँक खात्यातील रक्कमेवर कमी व्याज मिळणार आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, 1 सप्टेंबरपासून अशा कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत, जे तुम्हाला जाणून घेणे खूप गरजेचे आहे. कारण या नियमांचा तुमच्यावर परिणाम होणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या व्याजदरात बदल
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) बचत खात्यावरील व्याज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 सप्टेंबरपासून पंजाब नॅशनल बँकेच्या बचत खात्यात जमा झालेल्या रकमेवर 2.90% व्याज मिळेल. सध्या बँक त्यावर 3% व्याज देत आहे.

EPF खाते आधारशी लिंक करणे आवश्यक
EPFO ने EPF खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही 1 सप्टेंबरपूर्वी ईपीएफ खात्याला आधारशी लिंक केले नाही तर तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान थांबवले जाईल.

या व्यतिरिक्त, तुम्हाला ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात. विशेष म्हणजे तुम्ही जर लिंक केले नाही तर ईपीएफओच्या सेवा वापरता येणार नाही.

अॅक्सिस बँकेने पीपीएसला केले अनिवार्य
अॅक्सिस बँकेसह इतर अनेक बँकांनी जास्त रक्कमेवरील चेकसाठी पीपीएस अनिवार्य केले आहे. त्यामुळे ग्राहकांना चेक दिल्यानंतर बॅकेंला नेट/मोबाईल बँकिंगद्वारे किंवा शाखेत जाऊन चेक डिटेल्स द्यावे लागेल. परंतु, ज्यांच्याजवळ या सुविधा नाहीत त्यांना या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेष म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा कोटक बँकांनी पीपीएसला अनिवार्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये चेक जारी करण्याची तारीख, 6 अंकी चेक क्रमांक, रक्कम, लाभार्थ्यांचे नाव इत्यादींचा समावेश आहे.

डिस्ने+ हॉटस्टारची योजना महाग
OTT प्लॅटफॉर्म डिस्ने+ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन्स महाग होणार आहे. वापरकर्त्यांना आता बेस प्लॅनसाठी 399 रुपयांऐवजी 499 रुपये द्यावे लागणार आहे. या व्यतिरिक्त, वापरकर्ते 899 रुपयांमध्ये दोन फोनमध्ये अॅप चालवू शकतील. तसेच, तुम्ही हे अॅप 4 स्क्रीनवर चालवण्यासाठी 1,499 मोजावे लागणार आहे.

गॅस सिलिंडरच्या किंमतीत होऊ शकतो बदल
1 सप्टेंबरपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमती बदलू शकतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरचे नवीन दर ठरवतात.

बातम्या आणखी आहेत...