आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे प्रॉपर्टी मार्केट घसरल्याचा भारताला फायदा:चीनमधूून भारतात येताहेत निराश रिअॅल्टी गुंतवणूकदार

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या प्राॅपर्टी मार्केटमध्ये सलग घसरणीचा फायदा भारताला होणार आहे. सिंगापूरची कॅपिटलँड इन्व्हेस्टमेंट (सीएलआय) सारखी ग्लोबल रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट फर्म भारत आणि व्हिएतनामसारख्या देशात गुंतवणुकीची संधी शोधत आहे. सीएलआयची सुमारे एक तृतीयांश गंुतवणूक चीनमध्ये आहे.

खरं तर, चीन सरकारच्या मते, नवीन घरांच्या किमती गेल्या सात वर्षांत सर्वात वेगाने कमी झाल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये प्राॅपर्टीची विक्रीदेखील सलग १५व्या महिन्यात कमी झाली. त्यामुळेच चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोच्या मते, या वर्षी ऑक्टोबरपर्यंत चीनमध्ये रिअल इस्टेट विकासात गुंतवणूक ८.८% घटली. दरम्यान, कमर्शियल प्रॉपर्टीच्या विक्रीत २२.३% आणि कमर्शियल बिल्डिंगची विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात २६.१% घट झाली.इकडे भारतीय प्रॉपर्टी मार्केटची अलीकडची आकडेवारी चीनचे उलट चित्र मांडत आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील प्रॉपर्टी प्राइस इंडेक्स सलग वाढत आहे.

चीनच्या तुलनेत भारतीय प्रॉपर्टी मार्केट यामुळे आकर्षक चीन सलग घसरत चाललेय चीनचे प्रॉपर्टी मार्केट ऑक्टोबरमध्ये, चीनच्या गृहनिर्माण मालमत्तेच्या बाजारपेठेत ऑगस्ट २०१५ नंतरच्या किमतींमध्ये सर्वात मोठी घसरण झाली. - गेल्या महिन्यात चीनच्या ७० मोठ्या शहरांत नवीन घरांच्या किमती १.६ घटल्या. ही सलग सहाव्या महिन्यात घसरण दिसून आली.

(स्रोत: नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑफ चायना, चायना इंडेक्स अकादमी)

भारत २०२२ च्या पहिल्या ९ महिन्यांत भारतातील ८ प्रमुख शहरांमध्ये १.६१ लाख घरे विकली गेली, जी २०१४ नंतर सर्वाधिक आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीपासून घरांच्या किमतींमध्ये सरासरी ५% वाढ झाली. - एप्रिल-जून तिमाहीत, रिझर्व्ह बँकेचा अखिल भारतीय गृहनिर्माण किंमत निर्देशांक (एचपीआय) वार्षिक ३.५% वर चढला.

(स्रोत: आरबीआय, प्रॉप टायगर)

बातम्या आणखी आहेत...