आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​एफटीएसईच्या डेट निर्देशांकात सामील होतील देशी बाँड, बसल्या जागी अब्जावधींची गुंतवणूक

लंडन (लियाऊ वाय सिंग आणि लिलियन कारुनुंगम ​​)11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताचे सरकारी बाँड एफटीएसईच्या वॉच लिस्टमध्ये

गुंतवणूकदारांची मोठ्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारसाठी एक चांगली बातमी आहे. भारत सरकारच्या बाँडला लंडनच्या फायनान्शियल टाइम स्टॉक एक्सचेंजच्या (एफटीएसई) डेट निर्देशांकात स्थान मिळू शकते. तसे झाल्यास कोरोना काळात कर संकलनात आलेल्या घटीमुळे निधीच्या टंचाईचा सामना करणाऱ्या भारत सरकारला बसल्या जागी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक मिळेल.

जाणकारांनुसार, भारताच्या सरकारी बाँडला एफटीएसईच्या इमर्जिंग मार्केट गव्हर्नमेंट बाँड इंडेक्समध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या हे बाँड एफटीएसईच्या वॉच लिस्टमध्ये आहेत. ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड बँकिंग ग्रुप लिमिटेडमध्ये आशिया आणि भारतासाठीचे मुख्य अर्थतज्ज्ञ संजय माथूर म्हणाले, या पावलामुळे भारतीय बाँडमध्ये अब्जावधी डॉलरचा प्रवाह होण्याची शक्यता आहे. भारतीय बाँडला याच्या मार्केट अॅक्सेबिलिटीच्या १ ते १० पर्यंत वर्गीकरणासाठी आढावा घेतला जाईल. यामुळे हे बाँड समाविष्ट होण्याच्या किमान पातळीच्या आवश्यकतेत येतील. या घोषणेमुळे डेट मार्केटमध्ये जास्त अवधीसाठी जास्त गुंतवणूक निश्चित करण्यात मदत मिळेल. यासोबत सरकारी वित्तावर जास्त राजकोषीय शिस्तही लागू होईल.

७३ हजार कोटी रुपयांचा प्रवाह येऊ शकतो
हाँगकाँगची क्रेडिट अॅग्रीकोल सीआयबीचे सीनियर इमर्जिंग मार्केट धोरणकर्ते डारियुज कोवालजिक यांच्यानुसार, एफटीएसई निर्देशांकात समाविष्ट झाल्याने भारतीय सरकारी सिक्युरिटीजमध्ये जवळपास १० अब्ज डॉलरपेक्षा(७३ हजार कोटी रुपये) इन्फ्लो आकर्षित होण्याची अपेक्षा आहे. कोरोना काळात कर संकलनात मोठी घट आली आहे. अशा स्थितीत भारत सरकारला मोठा दिलासा मिळू शकतो.

बातम्या आणखी आहेत...