आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएनजी, पीएनजीच्या दरात वाढ:मुंबईत सीएनजी 6 रूपयांनी वाढून 86 रूपये प्रति किलो, पीएनजीच्या दरात प्रती युनिट 4 रूपयांची वाढ

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्याने मुंबईत कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) किंमती वाढल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने CNG च्या दरात प्रति किलो 6 रुपयांनी वाढ केली आहे.

याशिवाय मुंबईत पीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. त्याची किंमत प्रति युनिट चार रूपयांनी वाढली आहे. या वाढीनंतर आता मुंबईतील सीएनजीची किरकोळ किंमत 86 रुपये प्रतिकिलो झाली. तर देशाअंतर्गत पीएनजीची किंमत 4 रूपयांनी वाढून 52.50 रूपये प्रति युनिट झाली आहे.

एप्रिलपासून सहावी दरवाढ

सीएनजी आणि पीएनजीच्या दरात या वर्षी एप्रिलपासूनची ही सहावी दरवाढ आहे. यापुर्वी 12 जुलै रोजी MGL ने गॅसच्या दरात वाढ केली आहे. त्यावेळी सीएनजीच्या दरात प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या दरात प्रति एससीएम 3 रूपयांनी वाढ करण्यात आली होती.

खर्च वाढल्याने किमती वाढल्या

एमजीएलच्या वतीने सांगण्यात आले की, गॅसच्या किमतीत वाढ झाल्यामुळे खर्चाची भरपाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. GAIL ने सिटी गॅस कंपन्यांना पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये 18 टक्के वाढ जाहीर केली आहे. या घोषणेनंतर देशातील शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढू लागल्या आहेत.

लखनौ शहरातही गॅसच्या किमतीत वाढ

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सोमवारी ग्रीन गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किमती प्रति किलो 5.3 रुपयांनी वाढवल्या होत्या. या वाढीनंतर लखनऊमध्ये सीएनजीची किंमत आता 96.10 रूपये प्रति किलो झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...