आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या अहवालावर गुरुवारी दिवसभर संसदेपासून बाजारापर्यंत हल्लकल्लोळ माजला. अमेरिकन स्टॉक एक्सचेंज डाऊ जोन्सने अदानी एंटरप्रायझेसला सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर कंपनीचे शेअर्स 35 टक्क्यांनी कोसळले. त्यानंतर दुपारपर्यंत त्यात रिकव्हरी झाली व ते केवळ 2.19च्या घसरणीसह 1531 रुपयांवर बंद झाले. या शेअर्समध्ये निम्न पातळीपासून 50 टक्क्यांची रिकव्हरी दिसून आली.
दुसरीकडे, अदानी समूहात SBI व LICने केलेल्या गुंतवणुकीवरून संसदेत सलग दुसऱ्या दिवशी तीव्र गदारोळ झाला. विरोधकांनी या प्रकरणी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) किंवा सुप्रीम कोर्टाच्या पॅनलच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा शेअर बाजार नियमांनुसार सुरू असल्याचे स्पष्ट केले. तसेच अदानींच्या बिझनेस वादामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास उडणार नसल्याचीही शक्यता व्यक्त केली.
हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी एका शेअरची किंमत 3500 रुपये होती. अशा प्रकारे मागील 9 दिवसांत कंपनीचे शेअर्स 70%नी घसरले आहेत. डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स 1999 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. हा निर्देशांक सार्वजनिक कंपन्यांच्या शाश्वत कामगिरीचे मूल्यांकन करतो.
यासंबंधीचे आजचे मोठे अपडेट्स
बांगलादेश-अदानींत 2017मध्ये करार
बांगलादेशने 2017 मध्ये अदानी पॉवर लिमिटेडसोबत वीज खरेदी करार केला. बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाने गुरुवारी अदानी पॉवरला एक पत्र लिहिले. त्यात वीज खरेदीचे दर बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. बीपीडीसीने अदानींची वीज महागड्या दराने वीज मिळत असल्याचा आरोप केला आहे. BPDC ने नोव्हेंबर 2017 मध्ये अदानी पॉवरसोबत 25 वर्षांसाठी 1496 मेगावॅट वीज पुरवठ्यासाठी करार केला होता.
प्रथम जाणून घ्या, अदानी व त्यांच्या कंपन्यांना कोणता फटका बसला...
श्रीमंतांच्या यादीत 22 व्या क्रमांकावर घसरण
शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाल्यामुळे गौतम अदानींची एकूण संपत्ती 55 अब्ज डॉलर्स झाली आहे. गतवर्षी ही 150 अब्ज डॉलर्सच्या आसपास होती. शुक्रवारी जारी झालेल्या फोर्ब्सच्या रिअल टाईम श्रीमंतांच्या यादीत अदानींची 22 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. 27 फेब्रुवारीपूर्वी अदानी हे जगातील तिसरे व आशियातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते.
कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण सुरूच
अदानींच्या 3 शेअर्सवर NSEची नजर
NSEने अदानी समूहाच्या 3 शेअर्सना अल्पमुदतीसाठी अॅडिश्नल सर्व्हिलांस मेजर्सच्या (ASM) यादीत टाकले आहे. यात अदानी पोर्ट, अदानी एंटरप्रायझेस व अंबुजा सिमेंटचा समावेश आहे. ASM निगराणीची एक विशेष पद्धत असते. त्या माध्यमातून मार्केटच्या रेग्युलेटर सेबी व मार्केट एक्सचेंज BSE, NSE त्यावर नजर ठेवते. याचे उद्दीष्ट गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करण्याचे असते. एखाद्या शेअरमध्ये चढ-उतार होत असल्यास त्याला NSEमध्ये टाकले जाते.
9 दिवसांत काय-काय घडले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.